Tuesday, December 23, 2025
Home बॉलीवूड अर्जुन बिजलानीचं नशीबच चमकलं! करण जोहरच्या बहुप्रतिक्षित चित्रपटात मिळालं काम

अर्जुन बिजलानीचं नशीबच चमकलं! करण जोहरच्या बहुप्रतिक्षित चित्रपटात मिळालं काम

अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) करण जोहरच्या (Karan Johar) ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत आहेत. अर्जुनने इन्स्टाग्रामवर करणने लिहिलेली एक नोट शेअर करून, करण जोहरच्या चित्रपटाचा भाग होणार असल्याची पुष्टी केली आहे. 

करणने लिहिले, “प्रिय अर्जुन, माझा चित्रपट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धर्मा प्रॉडक्शनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.” अर्जुनने त्याच्या इंस्टाग्रामवर ही नोट शेअर केली आणि लिहिले, “अखेर मला करण सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मी तुमच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची प्रशंसा करतो. मला आनंद आहे की, मी या चित्रपटाचा एक भाग होऊ शकलो.” (arjun bijlani will be seen in karan johar)

अर्जुन बिजलानीने पुष्टी केली की तो करण जोहरच्या चित्रपटाचा भाग आहे; याबद्दल इंस्टाग्रामवर शेअर करतो : बॉलीवूड न्यूज - बॉलीवूड हंगामा

अर्जुन व्यतिरिक्त ‘कुंडली भाग्य’मधील प्रीता म्हणजेच श्रद्धा आर्याला (Shradha Arya) देखील करण जोहरच्या या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. करणने श्रद्धाला एक हस्तलिखित नोटही पाठवली आहे. जी श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

कुंडली भाग्य अभिनेत्री श्रद्धा आर्या बॅग करण जोहरचा प्रोजेक्ट? तिची नवीनतम सोशल मीडिया पोस्ट तपासा – भारत न्यूज इंडिया

विशेष म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तरुण दिवा सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे या चित्रपटात कॅमिओ भूमिका करताना दिसणार आहेत. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट असून, पुढील वर्षी 10 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा

अडचणीत आलाय अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामीचा संसार? अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

स्वतःवरच राहिला नव्हता विश्वास, ‘या’ व्यक्तीच्या निधनाने पूर्णपणे तुटला होता अर्जुन बिजलानी; वाचा

KKK: अवघ्या २० सेकंदाच्या फरकाने अर्जुन बिजलानीने ट्रॉफीवर कोरले स्वत:चे नाव, तर दिव्यांका त्रिपाठी ठरली उपविजेती

हे देखील वाचा