अरे व्वा! पहिल्यांदाच स्क्रीनवर दिसणार अर्जुन अन् जान्हवी या भावंडांची जोडी, अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल


हिंदी चित्रपटांमध्ये कलाकारांच्या बाबतीत अनेक वेगवेगळे समीकरण बनताना आपण पाहिले आहेत. कलाकारांच्या या जोड्या कधी हिट ठरतात, तर कधी फ्लॉप. आतापर्यंत आपण अशा अनेक हटके जोड्या तयार झालेल्या आपण पाहिल्या आहेत. आता प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा एक नवीन आणि हटके जोडी येणार आहे. ती जोडी आहे अर्जुन कपूर आणि त्याची बहीण असलेली जान्हवी कपूर यांची.

इंडस्ट्रीमधील सर्वात चांगली आणि प्रेमळ भावा- बहिणीची जोडी म्हणून अर्जुन आणि जान्हवी ओळखले जातात. या दोघांना अनेकदा आपण कार्यक्रमांच्यावेळी एकत्र पाहिले असेल. मात्र, आता पहिल्यांदा यांना आपण स्क्रीनवर सोबत पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणाल ही बहीण भावाची जोडी कोणत्या सिनेमात दिसणार? काय भूमिका असणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही सांगणार आहोत.

Photo Courtesy: Instagram/janhvikapoor

नुकतेच जान्हवीने तिच्या इंस्टास्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये जान्हवीने एक बुमरँग शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून, जान्हवी पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉप, जॅकेट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. यात हे दोघं एका मजेशीर पद्धतीने उडी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, “कमिंग सून…समथिंग एक्सायटिंग.”

‘देसीमार्टिनी’च्या रिपोर्टनुसार, बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय भावाबहिणीची जोडी कोणत्या चित्रपटासाठी नाही, तर एका सिक्रेट प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहे. रिपोर्टनुसार, हे दोघे खूपच अविस्मरणीय सीन्स चित्रित करणार आहेत. हे प्रोजेक्ट या दोघांसोबतच सर्वांसाठीच खास असणार आहे, कारण याच माध्यमातून हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.

या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर अर्जुनचा काही दिवसांपूर्वीच ‘संदीप और पिंकी फरार’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. आगामी काळात तो, ‘भूत पुलिस’ आणि ‘एक व्हिलन रिटर्न्‍स’मध्ये दिसणार आहे, तर जान्हवी कपूरचा मार्चमध्ये ‘रुही’ सिनेमा प्रदर्शित झाला होता, जो सुपरहिट होता. आता जान्हवी ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना-२’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.