ईडीने यामी गौतमला बजावले समन्स; FEMA प्रकरणात ७ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे मिळाले आदेश


सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणारी अभिनेत्री म्हणजे यामी गौतम. यामीने आताच काही दिवसांपूर्वी लग्न केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या फोटोंचा धुमाकूळ चालला आहे. या बातम्यांमधून ती बाहेर पडते न पडते, तर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता यामी बाबत अशी बातमी समोर आली आहे की, ईडीने यामीला चौकशीसाठी बोलावले आहे.

या प्रकरणावर सूत्रांचे असे म्हणणे आहे की, विदेशी चलनाचे काही व्यवहार यामी गौतमच्या बँक खात्याशी जोडले आहे. त्यामुळे प्राथमिक चौकशीनंतर आता ईडीने यामीला ७ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावर साक्ष देण्यासाठी तिला बोलावले आहे. (ed summons yami gautam appear before next week record statement in connection alleged irregularities under fema)

यामीने मागील महिन्यात ‘उरी’ दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. तिने कोणालाही पूर्व कल्पना न देता हे लग्न केले होते.

यामीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती अभिषेक बच्चन सोबत ‘दसवी’ या चित्रपटात दिसणार आहे. यामीने तिच्या करीअरची सुरुवात २०१२ साली रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘विकी डोनर’ मधून केली आहे. यानंतर तिने ‘उरी’, ‘काबिल’, ‘सनम रे’, ‘गिनी वेड्स सनी’, ‘बदलापूर’ आणि ‘बाला’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ’ स्टार यशने खरेदी केले कोटींचे आलिशान घर; पत्नी राधिकासोबत पूजा करताना दिसला अभिनेता

जेव्हा वडिलांसोबत चित्रपट बघताना अचानक इंटीमेट सीन यायचा, तेव्हा…; तापसीने सांगितला ‘तो’ किस्सा

-महिमा चौधरी ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मंदिरा बेदीच्या पतीच्या मृत्यूवर ‘अशाप्रकारे’ दुःख व्यक्त केल्याने नेटकरी झाले नाराज


Leave A Reply

Your email address will not be published.