दीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट? अभिनेत्रीचा कैऱ्या खातानाचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न


बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात दीपिका पदुकोण नेहमी या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेचा भाग असते. सोशल मीडियावर देखील ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. दीपिका नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्ट, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दीपिकाची प्रत्येक पोस्ट तिला मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये चर्चेत आणतच असते.

दीपिकाने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ पाहून दीपिका प्रेग्नेंट आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सोशल मीडियावर कमेंट करून फॅन्स तिला याबद्दल प्रश्न देखील विचारत आहे. मात्र, दीपिकाने अजून यावर काहीही उत्तर दिले नाहीये. हा व्हिडिओ म्हणजे ती प्रेग्नेंट असल्याची हिंट आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

दीपिकाने नुकताच इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये दीपिका एका व्यक्तीला कैरी खाऊ घालत आहे. आणो तो व्यक्ती सांगत आहे की, दीपिका या कैरींवर तिखट मीठ लावून खाते. अशी कैरी खाल्यावर त्या व्यक्तीचा चेहराच बदलतो. कारण त्याला ती कैरी तिखट आणि आंबट लागत आहे. व्हिडिओ पाहून दीपिका व्हॅनिटी व्हॅनमध्ये असल्याचे जाणवत आहे. कामाच्या ब्रेकमध्ये ती कैरीचा आस्वाद घेत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दीपिकाने दोन मिरच्यांचे ईमोजी शेअर केले आहेत. त्यामुळे दीपिका प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याआधी देखील अनेकदा ती प्रेग्नेंट असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, काही काळाने त्या बातम्या हवेतच विरल्या. सोशल मीडियावर सक्रिय असलेली दीपिका ‘योगा डे’च्या पोस्टनंतर दिसलीच नव्हती. आज तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच काही दिवसांपासून ती मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये देखील दिसली नाहीये. रणवीर सिंगला मीडियाने अनेकदा स्पॉट केले. मात्र, त्याच्यासोबत दीपिका नव्हती. येणारe काळाच या व्हिडिओमधील सत्यता समोर आणेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.