Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड व्यायामाच्या बाबतीत ट्रेनरपेक्षाही अधिक कडक, व्हिडिओ शेअर करत त्यानेच केला खुलासा

अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड व्यायामाच्या बाबतीत ट्रेनरपेक्षाही अधिक कडक, व्हिडिओ शेअर करत त्यानेच केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा ही तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत असते. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन कपूरसोबत असलेले तिचे नाते खूपच चर्चेत आले. त्यानंतर ते दोघे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसापूर्वी त्याच्यात भांडण झाली होती, अशी बातमी आली होती. परंतु नुकतेच त्यांनी फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे की, त्यांच्यात सगळे काही ठीक आहे. ते दोघे सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. तेथील काही फोटो अर्जुन आणि मलायकाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

अर्जुन कपूरने नुकतेच मलायकासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट पाहिले, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की, अर्जुन आणि मलायका पूलमध्ये सायकल चालवताना दिसत आहेत. ही सायकल व्यायाम करण्यासाठी वापरतात. (Arjun Kapoor and Malaika Arora enjoying in Maldive, video viral)

अर्जुनने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून लिहिले आहे की, “जेव्हा तुमची गर्लफ्रेंड तुमच्या ट्रेनरपेक्षा जास्त अवघड टास्क देण्यात मास्टर असते. मी सुट्टीच्या दिवशी देखील कसरत करत आहे आणि याचे सगळे श्रेय मलायकाला जाते.” यासोबत त्याने हा व्हिडिओमध्ये त्याच्या ट्रेनरला देखील टॅग केले आहे.

अर्जुनने व्यायाम पूर्ण करण्यासाठी मलायकाने त्याला पूलमध्ये ढकलून दिले आहे. यावेळी ते दोघे खूप मस्ती करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांचे अनेक चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रया देत आहेत. त्यांच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, ” तुम्ही दोघेसोबत खूप छान दिसत.” तसेच आणखी एकाने त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे..

मलायका आणि अर्जुन मागील अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो सातत्याने व्हायरल होत असतात. अरबाज खानशी घटस्फोट झाल्यानंतर ते दोघे रिलेशनमध्ये आले. परंतु अर्जुन हा मलायकापेक्षा लहान असल्याने त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अशोकमामांसोबत ‘गंमत जंमत’ चित्रपटात झळकलेल्या ‘चारुशीला साबळे’ नंतर इंडस्ट्रीतून अचानक झाल्या गायब, आज आहे…

-तिसऱ्या आठवड्यातही ‘झिम्मा’ हाऊसफुल, सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

‘मीरा आणि मनू’ने धरला ‘नाटु नाटु’ गाण्यावर ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा