बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी तसेच त्याच्या ऍक्शन आणि फिटनेससाठी ओळखला जातो. त्याच्या पोस्टमुळे नेहमी तो चाहत्यांचा चर्चेत असतो. तसेच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. अलीकडेच त्याने वर्कआउट करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याने त्याची फिटनेस स्टाईल दाखवली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अर्जुनला देखील फिटनेस जपायला खूप आवडतो. तो न चुकता रोज जिममध्ये जातो. त्याच्या वायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अर्जुन आपला डाएट प्लॅन आणि फिटनेस प्लॅन सांगत आहे. तो दररोज किती कॅलरीज बर्न करतो, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी काय करतो आदी अनेक गोष्टी तो या व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एवढेच नाही, तर अर्जुनच्या या पोस्टवर अनेक युजर्स त्याला फिटनेस टिप्स देखील विचारताना दिसत आहेत. अर्जुन अलीकडेच ‘भूत पोलीस’ चित्रपटात दिसला होता.
अर्जुनाचा नुकताच ‘भूत पोलिस’ हा हॉरर-कॉमेडी ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित या चित्रपटात सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रमेश तौरानी आणि अक्षय पुरी समर्थित आणि जया तौरानी सह सहनिर्मित, १० सप्टेंबर रोजी ऑनलाईन स्ट्रीमिंग साइट डिजनी प्लस हॉटस्टारवर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील प्रत्येकाच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा देखील त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चेत येतात. दोघेही हातात हात घालून दिसत असतात. मलायका आणि अर्जुन नेहमी एकमेकांना सपोर्ट करतात. अर्जुनचा आगामी चित्रपट असो किंवा चित्रपटाचे प्रमोशन मलायका प्रत्येक गोष्टीत अर्जुनला पूर्ण पाठिंबा देते. त्याचबरोबर अर्जुन देखील मलायकाला पूर्ण पाठिंबा देतो. अर्जुनप्रमाणे मलायकाही तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा
-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट










