Tuesday, September 26, 2023

अर्जुन कपूरवर कोसळला दु:खाचा डोंंगर; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘तुझी नेहमी आठवण येत राहील’

प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असतो. अर्जुन सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. अर्जुनने त्याच्या अभिनेयाच्या जोरावर खुप प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. अर्जुन कधी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे तर कधी त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. तो सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट शेअर करत असतो. त्याने नुकताच एक पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अर्जुनने (Arjun Kapoor ) त्याच्या सोशल मीडिया अकांउटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्ट करताना लिहिले की, “जगातील सर्वोत्कृष्ट मुलगा…माझा मॅक्सिमस… सर्वात दयाळू, सर्वात गोड, धाडसी सर्वात जबाबदार…मला तुझी नेहमी आठवण येत राहील… मेरा बच्चा… आता आमचं घर कधीच पुन्हा पूर्वीसारखे राहणार नाही.…”

तसेच पुढे लिहिले की, “मला तिरस्कार आहे की तुला माझ्यापासून दूर नेले गेले आहे. मला माहित नाही की घरी कसे बसावे आणि तुझ्याभोवती कसे रहावे. मृत्यूने अनेकवेळा आपल्यावर क्रूरपणा केला आहे . यावेळीही काही वेगळे दिसत नाही. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही दिवसांत तू मला आणि अंशुला कपूरला जो आनंद दिलास त्याबद्दल धन्यवाद. काळजी घे माझ्या मित्रा, आराम कर, आरामशीर झोप. मी तुला दुसरीकडे बघेन माझ्या मॅक्सीमस. ” अर्जुनने मॅक्सीमसबरोबर खेळतानाचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

 अर्जुनची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलची व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. यावर अनेक सोलिब्रेटी आणि कपूर कुटुंबातील व्यक्तींनी देखील कमेंट केल्या आहेत. सिद्धार कपूरने लिहिले की,” लव्ह यू चाच… तो तिथे आनंदी आहे ..आई सोबत.” अभिनेत्री पुजा हेगडने कमेंट करताना लिहिले की, “अरे नको….” तसेच तिने तुटलेल्या हार्टचे इमोजी शेअर केले आहे. (Arjun Kapoor pet dog passes away)

अधिक वाचा-
अखेर प्रतीक्षा संपली! ‘बिग बॉस १७’ चा टिझर रिलीझ, सलमान खानचा नवा लूक व्हायरल
शाहरुख खानचा ‘डंकी’ 2024 मध्ये होणार रिलीज ? ‘या’ कारणामुळे निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

हे देखील वाचा