Saturday, July 6, 2024

प्रमोशनदरम्यान अर्जुन कपूरने केला सैफ अली खानसमोर ‘बेबो’बद्दल एक खुलासा; म्हणाला, ‘तिला…’

‘भूत पोलिस’ चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर चित्रपटाची गाणीही हळूहळू प्रदर्शित केली जात आहेत. ‘भूत पोलिस’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सैफ अली खान आणि अर्जुन कपूरने खूप मजा केली. एवढेच नाही, तर अर्जुनने करीनाला खूश करण्याचा उत्तम मार्गही सांगितला.

‘भूत पोलीस’ या चित्रपटात प्रेक्षक प्रथमच करीनाच्या ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन पतीला एकत्र पाहणार आहेत. सैफ आणि ‘बेबो’ला बाॅलिवूडमधील सर्वोत्तम जोडपे म्हटले जाते. तर अर्जुनने २०१६ मधील ‘की एँड का’ चित्रपटात करीनाच्या पतीची भूमिका साकारली. ‘भूत पोलीस’ हा चित्रपट गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशमध्ये शूट करण्यात आला आहे. शूटींग दरम्यान करीना धर्मशाळेत गेली होती. त्याचवेळी मलायकाही अर्जुन कपूरसोबत पोहोचली होती. त्यावेळी सैफ – करीना आणि मलायका – अर्जुन यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

सैफ आणि अर्जुन दोघेही सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच एका मुलाखतीत सैफला विचारण्यात आले की, “करीना नाराज असताना तिला आनंदी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?” सैफ प्रश्नाचे योग्य उत्तर देत असताना ‘बेबो’चा ऑन-स्क्रीन पती अर्जुनने मधेच उडी घेतली आणि म्हणाला, “तिला लंडनला घेऊन जा”, अर्जुनचे उत्तर ऐकून सैफला हसू आवरले नाही.

सैफ, करीना, अर्जुन आणि मलायका अरोरा हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. करीना आणि मलायका त्यांच्या बहिणी करिश्मा कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासोबत छान नात शेअर करताना दिसतात. ‘भूत पोलीस’ चित्रपटाबद्दल बोलायचे, तर आधी हा चित्रपट १७ सप्टेंबरला रिलीझ होणार होता. पण आता हा चित्रपट १० सप्टेंबरला म्हणजे एक आठवडा आधी रिलीझ होईल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा