Thursday, February 6, 2025
Home बॉलीवूड अरमान कोहलीच्या अडचणीत झाली वाढ; ‘इतके’ दिवस अभिनेता राहणार एनसीबीच्या ताब्यात

अरमान कोहलीच्या अडचणीत झाली वाढ; ‘इतके’ दिवस अभिनेता राहणार एनसीबीच्या ताब्यात

अभिनेता अरमान कोहली सध्या एका मोठ्या संकटात अडकला आहे. २८ ऑगस्ट रोजी एनसीबीने अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला होता. तेव्हा एनसीबीला अरमानच्या घरात ड्रग्स सापडले होते. याच प्रकरणात अरमानला अटक करण्यात आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अरमानला १ सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात ठेवले जाणार आहे.

महत्वाचे म्हणजे, २०१८ मध्ये अरमानला उत्पादन शुल्क विभागाने ४१ बाटल्या स्कॉच व्हिस्की बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. तर या संदर्भातील कायदा असा आहे की, दारूच्या फक्त १२ बाटल्या घरात ठेवण्याची परवानगी आहे. परंतु अरमानकडे जवळजवळ ४१ पेक्षाही अधिक बाटल्या होत्या आणि त्यापैकी बहुतेक दारूच्या बाटल्या या विदेशी ब्रँडच्या होत्या. (Actor Arman Kohli’s troubles have escalated further, he will be in the custody of NCB for a few days)

अरमान कोहलीबद्दल थोडक्यात
अरमानने १९९२ मध्ये ‘विरोधी’ चित्रपटाद्वारे सृष्टीत एक मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसोबत तो ‘दीवाना’ या चित्रपटात अभिनेता म्हणून भूमिका साकारणार होता. परंतु, तो या चित्रपटातून बाहेर पडला आणि नंतर चित्रपट शाहरुख खानकडे गेला. ‘दीवाना’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. ‘बाजीगर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी देखील अरमानचा विचार करण्यात आला होता, पण ती भूमिकाही शेवटी शाहरुख खानकडे गेली.

अरमानने १९९० च्या दशकात ‘दुश्मन जमाना’, ‘अनाम’ आणि ‘औलाद के दुश्मन’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले, जे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. ५ वर्षांनंतर  तो मल्टीस्टारर ‘जानी दुश्मन: एक अनोखी कहानी’ या चित्रपटासह पुन्हा एकदा चित्रपटात आला. परंतु तो देखील चित्रपट चांगली कामगिरी करू शकला नाही.

त्यानंतर सप्टेंबर २०१३ मध्ये अरमान कोहली रियॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ मध्ये स्पर्धक म्हणून सामील झाला. त्याचबरोबर १६ डिसेंबर २०१३ रोजी या शो दरम्यान अरमानला त्याच्या सह-सहभागी सोफिया हयातसोबत शारीरिक शोषण केल्याबद्दल अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्याची जामिनावर सुटका देखील झाली. १२ नोव्हेंबर २०१५ रोजी रिलीझ झालेल्या राजश्री प्रोडक्शनच्या सलमान खान स्टारर ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारत अरमानने १२ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा कमबॅक केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा