भाची आयतबरोबर मामा सलमानचा ‘तू जो मिला’ गाण्यावर ठेका, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


हिंदी सिनेसृष्टीतला दबंग खान म्हणजेच सलमान खान हा सध्या हिट चित्रपटाची ग्यारंटी झाला आहे. सलमान दरवर्षी त्याचा एक तरी सिनेमा प्रदर्शित करतो. तो नेहमी चित्रपट आणि इतर कार्यक्रमाचे शूटिंग करताना त्याच्या परिवारासाठी नेहमीच वेळ राखून ठेवतो. सलमानचे त्याच्या परिवारावर आणि कुटुंबातील छोट्या सदस्यांवर किती प्रेम आहे हे तर संपूर्ण जगाला माहिती आहे. सलमान नेहमी घरातल्या छोट्या सदस्यांबरोबर वेळ घालवत असतो. याचे अनेक फोटो, व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेयर देखील करत असतो. सध्या सलमानच्या घरात त्याची बहीण अर्पिताचे दोन्ही मुलं आहिल आणि आयत सर्वात लहान आहे. आयतचा जन्म तर सलमानच्याच वाढदिवसाच्या दिवशी झाला आहे.

सलमान, अर्पिता नेहमीच मुलांसोबत सलमानच्या मस्तीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेयर करता असतात. आता सध्या सलमानने आणि अर्पिताने सलमानचा आयतसोबतचा एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सलमानच्या आगामी ‘अंतिम’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेचा आहे. सलमान या व्हिडिओमध्ये आयतला कडेवर घेऊन डान्स करत आहे. व्हिडिओच्या मागे बजरंगी भाईजानचे ‘तू जो मिला’ हे गाणे चालू आहे. या गाण्यात सलमान त्याच्या ‘अंतिम’ चित्रपटाच्या लूकमध्ये दिसत असून आयत सुंदर फ्रॉकमध्ये आहे.

गाण्यातला मामा आणि भाचीचा क्युट डान्स सर्वानाच आवडत आहे. अर्पिताने हा व्हिडिओ शेयर करताना कॅप्शनमध्ये, “अनकंडिशनल लव्ह’ म्हणजेच ‘निस्वार्थ प्रेम’ लिहिले आहे.

सलमानने नुकताच ‘अंतिम’ चित्रपटाच्या सेटवरच शेरा सोबतच एक फोटो पोस्ट केला होता, आता आयतसोबतच व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या सलमान आणि आयुष्य शर्मा यांच्या ‘अंतिम’ चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. या सिनेमात सलमान एका शीख व्यक्तिरेखेत दिसणार आहे. हा सिनेमा मराठीतील ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमाचं टिझर काही दिवसांपूर्वी सलमानने शेयर केला होता.

सलमानचा ‘राधे’ हा सिनेमा येत्या ईदला प्रदर्शित होणार आहे. प्रभुदेवा यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात दिशा पाटणी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डा यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.