Saturday, June 29, 2024

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात अटक वॉरंट जारी? एकदा वाचा काय आहे प्रकरण

गेल्या काही दिवसांपासून एक झालं की एका कलाकारांना न्यायालयाकडून नोटिस बजवण्यात येत आहे. नुकतेच बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण या बॉलिवूडच्या तीन अभिनेत्यांना केंद्र सरकारने नोटीस पाठवली होती. आरोग्यासाठी घातक असलेल्या पान मसाल्याच्या जाहिरात केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. या दरम्यान आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्री विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अभिनेत्री आणि राजकारणी जयाप्रदा (Jayaprada) यांना निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणात अटक करण्याचे आदेश दिले आहेत. रामपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. 2019 मध्ये जयाप्रदा यांनी भाजपच्या तिकिटावर रामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जयाप्रदा यांचा पराभव झाला होता. दरम्यान, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांनी 19 एप्रिल रोजी नूरपूर गावात रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. या कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

आचारसंहिता लागू झाल्यानंतरही जयाप्रदा यांनी रस्त्याचं उद्घाटन केल्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी रामपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयात सुरु आहे. साक्ष प्रक्रियेनंतर जयाप्रदा यांना न्यायालयात त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी अनेकदा बोलावण्यात आलं, पण अभिनेत्री हजर राहिल्या नाहीत.

यामुळे न्यायालयाने जयाप्रदा यांना अटक (Jayaprada Arrest Warrant Issued) करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, रामपूर (Rampur) पोलिसांना जयाप्रदा यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपासणी 19 डिसेंबरला होणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) 2019 दरम्यान जयाप्रदा यांच्यावर स्वार आणि केमरी पोलीस स्टेशनमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्याच्या दिलेल्या या आदेशामुळे जयाप्रदा यांची राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पुढे काय होणार हे पाहण महत्वाचे ठरणार आहे. (Arrest warrant for famous actress and politician Jayaprada)

आधिक वाचा-
Siddharth Shukla Birth Anniversary| जगभरातील मॉडेल्सला हरवून सिद्धार्थ शुक्ला ठरला होता ‘वर्ल्ड्स बेस्ट मॉडेल’ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय
Siddharth Shukla |बापरे! तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेला सिद्धार्थ शुक्ला; आकडा तर वाचाच

हे देखील वाचा