Monday, February 26, 2024

अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ सिनेमाच्या रिलीझ डेटमध्ये बदल, सिनेमा होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. अक्षय कुमारला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. त्याचे लाखो चाहते आहेत. अक्षय कुमारचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी काही करण्यास तयार असतात. गेल्या काही दिवसांंपासून चाहते अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5‘ ची वाट पाहत आहेत. त्या चाहत्यासाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. बहुचर्चित ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

साजिद नाडियादवाला निर्मित आणि तरुण मनसुखानी दिग्दर्शित, हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा विनोदी चित्रपट मानला जातो. त्याच वेळी, आता त्याची रिलीज डेटवर एक मोठे अपडेट समोर आले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ‘हाऊसफुल 5‘ (Housefull 5 movie) याआधी 2024ला दिवाळीत प्रदर्शित करण्याची योजना होती. त्याचवेळी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना आता मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपट आता 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आता हा चित्रपट 6 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की, “हाऊसफुल फ्रँचायझीच्या प्रचंड यशाचे श्रेय प्रेक्षकांना दिले जाते आणि आम्हाला ‘हाऊसफुल 5’ साठी अशाच प्रतिसादाची अपेक्षा आहे. आम्ही सर्वोत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभवासह पाचपट मनोरंजन देऊ शकतो याची खात्री करण्यासाठी आम्ही रिलीजला डेट आणखी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हाऊसफुल 5’ आता 6 जून 2025 रोजी रिलीज होणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 ‘हाऊसफुल 5’ मध्ये, अक्षय कुमार आणि रितेश देशमुख मागील चित्रपटांमधून त्यांच्या भूमिकांची पुनरावृत्ती करताना दिसतील, तसेच काही नवीन कलाकर देखील स्टार कास्टमध्ये जोडले जातील. ‘हाऊसफुल’ ही पहिली कॉमिक फ्रेंचाइजी असणार आहे, ज्या अंतर्गत पाच चित्रपट असतील. ‘हाऊसफुल 5’ यूकेमध्ये मोठ्या प्रमाणावर शूट केले जाईल, जिथे निर्मात्यांनी काही भव्य सेट आणि लोकेशन्सची योजना केली आहे. हा चित्रपट हाय-ऑक्टेन अॅक्शन, कॉमेडी आणि रोमान्ससह व्हिज्युअल तमाशा असेल अशी अपेक्षा आहे.

‘हाऊसफुल’चा पहिला भाग 2010 मध्ये रिलीज झाला होता आणि त्यात अक्षय, रितेश देशमुख, लारा दत्ता, दीपिका पदुकोण, अर्जुन रामपाल आणि बोमन इराणी यांनी भूमिका केल्या होत्या. यानंतर 2012 मध्ये रिलीज झालेला ‘हाऊसफुल 2’ चा आणखी एक हिट सिक्वेल आला. (Change in the release date of Akshay Kumar Housefull 5 movie)

आधिक वाचा-
‘अनंत युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत’; सावित्रीमाईंची लूक पाहाच
‘सेक्स आणि हिंसा…’, ‘अ‍ॅनिमल’च्या रिलीजनंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा