Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘डेब्यूनंतर मला सपोर्ट केला नाही’, अभिनेत्याचा अमिताभ बच्चन यांच्याबद्दल हैराण करणारा खुलासा

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी हे त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने त्याच्या करिअरची सुरूवात १९९६ मध्ये आलेली ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटातून केली होती. यानंतर त्याने खूप लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे. आता तो अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’त दिसणार आहे. अर्शद वारसीचा पहिला चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या ‘एबीसीए’ या कंपनीने तयार केला होता. त्याचवेळी, आता इतक्या वर्षांनंतर अर्शद वारसीने अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कंपनीविरोधात वक्तव्य केले आहे. ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कंपनीने त्याला साथ दिली नसल्याचा खुलासा अभिनेत्याने केला आहे.

अर्शद आता त्याचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच तो एका पत्रकार परिषेदमध्ये सहभागी झाला होता. ही पत्रकार परिषेद ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाशी संबधित होती. त्यात त्याने काही मोठे खुलासे केले आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारचा एक डायलॉग आहे, “मुझे भाई नही गॉडफादर बोलते है.” या डायलॉगविषयी बोलताना त्याला बॉलिवूडधील तुमचा गॉडफादर कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने हैराण करणारे उत्तर दिले आहे.

तो म्हणाला, “मी मिस्टर बी म्हणेल. मी माझ्या करियरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल (ABCL) जॉय ऑगस्टीन चित्रपटातून केली होती, पण त्यानंतर ते मला सोडून गेले. त्यांनी मला साथ दिली नाही. त्यामुळे त्यांना काय बोलावे तेच कळत नाही. गॉडफादर किंवा काय,मला माहित नाही.”

अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार गँगस्टरच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात अक्षयसोबत अर्शद वारसी, क्रिती सेनन प्रमुख भूमिकेत आहेत. क्रिती सेनन ही या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून दिसणार आहे, जी बच्चन पांडे हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेते. यातच अर्शद वारसी हा क्रिती सेननला गँगस्टर म्हणजेच अक्षय कुमारशी भेट करून देतो. या चित्रपटात प्रेक्षकांना खूप ऍक्शन आणि धमाल बघायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही  वाचा-

हे देखील वाचा