×

‘होली पे गोली’ म्हणत ‘बच्चन पांडे’ करणार मोठा धमाका, अक्षयच्या दमदार लूकने वेधले लक्ष

अक्षय कुमार आणि कृती सेनन यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘बच्चन पांडे’ सिनेमाचा ट्रेलर आज (१८ फेब्रुवारी) रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शनानंतर आणि घोषणेनंतर दर्शकांच्या मनात सिनेमाबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली होती. आज या ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर अक्षयच्या फॅन्समध्ये आनंदाची लहर निर्माण झाली असून, अक्षयचा सिनेमातील अंदाज आणि लूक सर्वानाच आवडत आहे. या सिनेमात अक्षयने गॅंगस्टरची भूमिका साकारली असून त्याच्या जबरदस्त लूकने तुफान लाइमलाईट मिळवले आहे. या सिनेमातील अक्षयचा लूक अतिशय भयानक आणि भीतीदायक आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या सिनेमात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत दिसत आहे. कृती एक दिग्दर्शक असून, तिला तिचा आगामी सिनेमा बच्चन पांडे या भयानक गुंडांवर बनवायचा असल्याने ती अर्शद वारसीची बच्चन पांडेला भेटण्यासाठी आणि त्याची माहिती काढण्यासाठी मदत मागते. मात्र बच्चन पांडे खूपच मोठा आणि क्रूर गुंड असल्याने तो तिला मदत करण्यासाठी आधी नकार देतो, नंतर मदत करतो. मात्र या दरम्यान त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या ट्रेलरमधून पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, प्रतीक बब्बर आदी कलाकारांच्या देखील भूमिका आहे. यासोबतच जॅकलिनने या चित्रपटात अक्षयच्या गर्लफ्रेंडची सोफीची भूमिका साकारली असून, तिच्या ग्लॅमरस लुकचा तडका सिनेमाला लावला आहे. सिनेमात कॉमेडीसोबतच दमदार ऍक्शन देखील पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमारने २००८ साली आलेल्या ‘टशन’ सिनेमात ‘बच्चन पांडे’ ही भूमिका साकारली होती. याच भूमिकेवरून या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. कृती आणि जॅकलिनने याआधी ‘हाऊसफुल ३’ सिनेमात एकत्र काम केले आहे. सध्या या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी देखील त्यांना हा ट्रेलर आवडत असल्याच्या कमेंट्स करताना दिसत आहे. येत्या १८ मार्चला सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

 

Latest Post