टेलिव्हिजनवरील एक शो या वर्षी जोरदार गाजला होता. तो शो म्हणजे ‘इंडियन आयडल १२’ होय. या शोने तब्बल १० महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. इंडियन आयडलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. या शोमधील सगळे स्पर्धक आणि परीक्षक देखील जोरदार चर्चेत होते. हा शो अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मालिकेतील स्पर्धकांच्या आवाजाने परीक्षकांचेच नव्हे, तर आख्ख्या भारतातील जनतेचे मन जिंकले होते. या शोचा विजेता पवनदीप राजन झाला आहे, तर उपविजेती अरुणिता कांजीलाल ठरली आहे. या शोमध्ये या दोघांची जोडी सर्वांना खूप आवडली होती. त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. अशातच पवनदीप आणि अरुणिताचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
पवनदीपने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याचा आणि अरुणिताचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे ‘राता लंबिया’ या गाण्यावर अभिनय आणि डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये अरुणिताने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तर पवनदीपने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि जॅकेट घातले आहे. त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.
त्यांच्या चाहत्यांना त्यांचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्या दोघांचे चाहते या व्हिडिओवर अनेक कमेंट करत आहेत. ‘इंडियन आयडल’ शोपासूनच त्यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. अनेकजण कमेंट करून त्यांचे कौतुक करत आहेत.
पवनदीप आणि अरुणिता हे ‘इंडियन आयडल’ या शोमधील सगळ्यांचे आवडते स्पर्धक होते. त्यांच्या मधुर आवाजाने त्यांनी सगळ्यांना त्यांच्याकडे आकर्षित केले होते. त्या दोघांनी सोबत एक गाणे देखील रेकॉर्ड केले आहे. पवनदीप या शोचा विजेता झाल्यांनतर त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. सोशल मीडियावर देखील ते एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’
-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…
-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत