शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान बी-टाऊनमधील सर्वात प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. आर्यन खान त्याच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या पहिल्या वेब मालिकेचे नाव ‘स्टारडम’ आहे. त्याच्या आगामी मालिकेबाबत अनेक प्रकारचे अपडेट्स समोर येत आहेत. आता बातमी अशी आली आहे की शाहरुखच्या मुलाने त्याची हि मालिका रिलीज होण्यापूर्वीच दिल्लीत दोन फ्लॅट खरेदी केले आहेत.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने अलीकडेच दक्षिण दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये सुमारे ३७ कोटी रुपयांना २ मजले खरेदी केले आहेत. या कुटुंबाची आधीच इमारतीच्या तळघर आणि तळमजल्यावर मालकी आहे,हि तीच जागा आहे जिथे शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी त्यांच्या सुरुवातीच्या काळात राहत असत. या जागेचा व्यावहार मे २०२४ मध्ये नोंदणीकृत झाला आणि २.६४ कोटी रुपये शुल्क भरले गेले असल्याचे वृत्त द इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.
हे घराचे शाहरुख आणि गौरीच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. शाहरुख खान आणि गौरीची पहिली भेट दिल्लीत झाली होती. पंचशील पार्कमध्ये असलेला २७,००० चौरस फुटांचा हेरिटेज व्हिला शाहरुखच्या मालकीत आहेत, हा व्हिला त्याने २००१ मध्ये १३ कोटी रुपयांना विकत घेतला होता. अहवालांवर विश्वास ठेवला तर आज या मालमत्तेची किंमत सुमारे २०० कोटी रुपये आहे. २०२० मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात शाहरुखने एअरबीएनबीवर त्याचे घर भाड्याने उपलब्ध करून दिले होते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आर्यन खानच्या बहुप्रतिक्षित ‘स्टारडम’ या मालिकेची कथा मनोरंजनाच्या ग्लॅमरस दुनियेभोवती फिरते. प्रसिद्धी, यश आणि स्टार बनण्याची इच्छा यातील चढ-उतार या मालिकेत दाखवण्यात आले आहेत. हि मालिका स्वतः आर्यन खानने लिहिली आहे. तर शाहरुख त्याच्या आगामी ‘किंग’ या सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमात आर्यनची बहिण आणि शाहरूखची लेक सुहाना देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
न्यू जर्सीमध्ये फॅनने लावला होता बिग बींचा पुतळा, गुगल मॅपमध्ये सापडली ही खास जागा
नव्या स्तरावरील धोक्यांसाठी तयार राहा …. खतरोंके खिलाडी मध्ये हे असतील नवीन चेहरे