Thursday, April 23, 2026
Home टेलिव्हिजन नव्या स्तरावरील धोक्यांसाठी तयार राहा …. खतरोंके खिलाडी मध्ये हे असतील नवीन चेहरे

नव्या स्तरावरील धोक्यांसाठी तयार राहा …. खतरोंके खिलाडी मध्ये हे असतील नवीन चेहरे

‘खतरों के खिलाडी’ या स्टंट रिॲलिटी शोच्या १४ व्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. रोहित शेट्टीचा हा शो आजपासून सुरू होत आहे. पुन्हा एकदा सहभागी धोकादायक स्टंट करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करताना दिसणार आहेत. रोहित शेट्टी बऱ्याच वर्षांपासून हा शो होस्ट करत आहे. यावेळीही तो यजमानपदावर विराजमान आहे. यावेळचा शो अनेक अर्थांनी खास आहे. शो किती वाजता सुरू होईल आणि तो कुठे पाहता येईल, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

‘खतरों के खिलाडी १४ ‘चा प्रीमियर आज रात्री ९ : ३० वाजता कलर्स वाहिनीवर होणार आहे. हा कार्यक्रम दर शनिवार आणि रविवारी रात्री ९ : ३० वाजता या वाहिनीवर प्रसारित होईल. यावेळी शोचे शूटिंग केपटाऊनमध्ये नाही तर रोमानियामध्ये झाले आहे. आज कलर्स चॅनलच्या इन्स्टा हँडलवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये ही सर्व माहिती दिली आहे. पोस्टमध्ये रोहित शेट्टी दिसत आहे. यासोबतच रोहित शेट्टी इशारा देतोय. ‘नव्या स्तरावरील धोक्यांसाठी तयार राहा, भीतीचा नवा पत्ता – रोमानिया’.

ज्यांना काही कारणास्तव कलर्सवर हा शो पाहता येणार नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे हा शो ओटीटीवरही प्रसारित होणार आहे. आजकाल चित्रपट असो वा शो, तो ओटीटीवर कुठून येणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडतोच. हा शो जिओ सिनेमावर प्रसारित होणार आहे. मात्र, तो पाहण्यासाठी तुम्हाला २९ रुपये मासिक शुल्क भरावे लागेल.

यावेळी शो ची ट्रॉफी मिळवण्यासाठी १२ सहभागी रोहित शेट्टीच्या शोमध्ये येणार आहेत. या स्टंट शोमध्ये बिग बॉसचे काही स्पर्धकही दिसणार आहेत. जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफनेही या शोमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय शोमध्ये सुमोना चक्रवर्ती, शालीन भानोत, असीम रियाझ, आदिती शर्मा, शिल्पा शिंदे, अभिषेक कुमार, आशिष मल्होत्रा, निमृत कौर अहलुवालिया, गश्मीर महाजनी, नियती फतनानी आणि करण वीर मेहरा असे चेहरे दिसणार आहेत.

‘खतरों के खिलाडी’ हा रिॲलिटी शो २००८ साली सुरू झाला. पहिला सीझन अक्षय कुमारने होस्ट केला होता. दुसरा सीझनही अक्षयनेच होस्ट केला होता, तर तिसरा सीझन प्रियंका चोप्राने होस्ट केला होता. त्यानंतर २०११ मध्ये पुन्हा अक्षय कुमारने चौथा सीझन होस्ट केला होता. पाचवा आणि सहावा सिझन रोहित शेट्टीने होस्ट केला होता आणि अर्जुन कपूर सातव्या सीझनचे सूत्रसंचालन करण्यासाठी आला होता. पण, आठव्या सिझनपासून रोहित शेट्टीच हा शो होस्ट करत आहे आणि यजमान म्हणूनही तो खूप पसंत केला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ते गुलीगत सूरज चव्हाण; कोण आहे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील 16 सदस्य?
ऋषी कपूर यांच्या निधनावर रणबीर कपूर का रडला नाही? अभिनेत्याने सांगितले मोठे कारण

हे देखील वाचा