Monday, June 17, 2024

‘पहिलं लग्न लावताना समीर मुस्लिम होते…’, वानखेडेंना ‘खोटं’ म्हणत, त्यांच्याच लग्नातील काझींनी केला नवा दावा

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतल्यापासून, महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक समीर वानखेडेंवर हल्ला करत आहे. वानखेडे यांच्यावर मलिक रोज नवनवे आरोप करताना दिसत आहेत. बुधवारी (२७ ऑक्टोबर) सकाळीच मलिक यांनी समीर वानखेडेंच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला. तर आता या प्रकरणात वानखेडे यांचा विवाह सोहळा पार पाडणारे काझीही समोर आले आहेत.

मुझम्मिल अहमद नावाच्या काझींचा दावा आहे की, २००६ मध्ये त्यांनी स्वतः समीर दाऊद वानखेडेचं लग्न लावलं होतं. काझी मुझम्मिल यांनी एका वृत्तवाहिनीशी केलेल्या संवादात म्हटले आहे की, लग्नाच्या वेळी वानखेडे मुस्लिम होते, त्यामुळे त्यांनी वानखेडेचे लग्न लावले. ते मुस्लिम शिवाय इतर कोणत्याही धर्मियांचे लग्न लावत नाहीत. (aryan khan case kazi mujammil ahmed says sameer wankhede is a muslim i am witness his nikaah)

नवाब मलिक यांच्यानंतर काझींनीही वानखेडे यांना खोटारडे म्हटले आहे. निकाहनाम्यातील उर्दू भाषेतील सह्या त्यांच्याच असल्याचंही त्यांनी मान्य केले. शरियतनुसार गैर मुस्लिम व्यक्ती लग्न करू शकत नाही. जेव्हा वानखेडे त्यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या वडिलांना मुस्लिम असल्याचे म्हटले होते, त्यानंतरच त्याचे लग्न पार पडले.

काझींनी सांगितले की समीर यांनी हिंदू म्हटले असते, तर त्यांचे लग्न झाले नसते. त्याच्या विवाह सोहळ्यासाठी हजारो लोक आले होते, प्रत्येकजण त्यांच्या कुटुंबाला मुस्लिम मानत होता. जर ते मुस्लिम नसते, तर हे लग्नच झालं नसतं. समीर वानखेडे जे विशेष विवाह कायद्याबाबत बोलत आहेत, ते चुकीचं आहे.

यापूर्वी समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नवाब मलिक यांना जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलं होतं, “मी आणि माझे पती समीर जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केलेले नाही. आम्ही दोघेही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडील देखील हिंदू आहेत, ज्यांनी माझ्या मुस्लिम सासूशी लग्न केले, त्या आता या जगात नाहीत. समीरचे पहिले लग्न स्पेशल मॅरेज ऍक्टनुसार झाले होते, दोघांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. समीर आणि मी २०१७ मध्ये हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न केले.”

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या झोनल डायरेक्टरचा जन्म दाखला सार्वजनिक केल्यानंतर, समीर वानखेडे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. यात ते म्हणाले होते, “मी बहुधार्मिक कुटुंबातील आहे. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. ते हिंदू आहे. त्याच वेळी, माझी दिवंगत आई झहीदा मुस्लिम कुटुंबातील होती.” पुढे ते म्हणाले की, “मी धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे, भारतीय परंपरांचे पालन करणाऱ्या कुटुंबाचा मी भाग आहे.” समीर वानखेडे यांनी प्रसिद्धीपत्रकात आपल्या पहिल्या पत्नीचा उल्लेख देखील केला आहे. त्यांनी सांगितले की २००६ मध्ये त्यांनी मुस्लिम महिला डॉक्टर शबाना कुरेशीशी लग्न केले, परंतु २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर २०१७ मध्ये त्यांनी क्रांती दीनानाथ रेडकरशी लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आम्हाला मारून टाकण्याच्या धमक्या येतायेत…’, पत्रकार परिषदेत क्रांतीने केला पती वानखेडेंच्या आरोपावर पलटवार

-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

हे देखील वाचा