Monday, July 8, 2024

आर्यन खान केस: चार्जशीट दाखल करण्यासाठी एनसीबीने मागितली ९० दिवसांची अधिक मुदत

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा असलेल्या आर्यन खानच्या अं’मली पदार्थांच्या केसमध्ये (Aryan Khan Case) एक मोठा बदलाव झाला आहे. २ एप्रिल २०२२ पर्यंत आर्यन खानच्या केससंबंधी तपस यंत्रणांना चार्जशीट दाखल करायची होती. मात्र आता मिळत असलेल्या माहितीनुसार ही चार्जशीट दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. एएनआई त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याबद्दल माहिती दिली आहे.

एएनआय यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आर्यन खान अं’मली पदार्थ केस. एनसीबीच्या एसआयटीने मुंबई सत्र न्यायालयाकडे चार्जशीट दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा अतिरिक्त कालावधी मागितला आहे.” तत्पूर्वी आर्यन खानच्या अं’मली पदार्थ केस आता एनसीबीच्या एसआयटीकडे देण्यात आली आणि आर्यन खानला या प्रकरणात दर शुक्रवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी देण्यापासून सुटका देखील करण्यात आली. न्यायमूर्ति एन डब्ल्यू सांबरे यांच्या खंडपीठाने आर्यन खानला जामीन देताना लावण्यात आलेल्या अटींना दर्शविताना सांगितले की, त्याला दर शुक्रवारी एनसीबी ऑफिसमध्ये हजर राहावे लागणार आहे. आर्यन खानला कोणत्याही आरोपीला भेटण्याची परवानगी नसून, त्याला त्याचा मित्र असलेल्या अरबाजला देखील भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आर्यन खानने त्याचा पासपोर्ट देखील जमा केला आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये आर्यन खानला त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांच्यासोबत अटक करण्यात आली होती. एनसीबीकडून एका क्रूझवर मारण्यात आलेल्या छाप्यामध्ये एका अं’मली पदार्थांच्या पार्टीचा पर्दाफार्श करण्यात आला होता. या छापेमारीचे नेतृत्व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केले होते. २५ दिवस जेलमध्ये घालवून आर्यनला बॉम्बे कोर्टाने जामीन दिला. त्याचा जामीन आधी सत्र न्यायालयाने आणि नंतर एका विशेष एनडीपीएस कोर्टाने नाकारला.

या केसनंतर आर्यन खान आता विविध कार्यक्रमांना स्पॉट केला जातो. बॉलिवूडच्या विविध पार्ट्यांमध्ये आणि आयपीएलच्या लिलावामध्ये देखील आर्यन खानला पाहिले गेले होते. एका माहितीनुसार सध्या आर्यन खान एका वेबसिरीजच्या लिखाणाचे काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा