Saturday, April 20, 2024

Video | पत्नीबद्दल अँकर बोलला असे काही की Oscars पुरस्कार विजेत्याने थेट स्टेजवर जाऊन कानफाड फोडलं

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथला (Will Smith) ‘किंग रिचर्ड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार स्वीकारताना स्मिथ स्टेजवर अक्षरश: रडला. अश्रू पुसत त्याने आपल्या टीमचे आभार मानले. पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळण्याआधीच विल स्मिथने स्टेजवर जाऊन कॉमेडियन ख्रिस रॉकसोबत (Chris Rock) असे कृत्य केले, की ते पाहून सगळेच थक्क झाले. कॉमेडियन ख्रिस रॉकने त्याच्या एका विनोदात विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथचा (Jada Pinkett Smith) उल्लेख केला आणि हे ऐकून स्मिथने स्टेजवर चढून ख्रिसला बुक्की मारली. ख्रिसने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर अशी कमेंट केली होती, जी स्मिथच्या पत्नीला अजिबात आवडली नाही.

खरं तर, ख्रिस रॉकने ‘G.I Jane 2’ चित्रपटाबाबत विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली होती. जाडाच्या टक्कल पडण्यावर कमेंट करताना ख्रिस रॉक म्हणाला की, “टक्कल असल्यामुळेच तिला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.” ख्रिसने ऑस्करच्या मंचावर ‘G.I Jane 2’ या चित्रपटाचा हा जोक परत बोलण्याचा प्रयत्न केला. हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये बसलेला विल स्मिथ उठला आणि त्याने स्टेजवर जाऊन ख्रिसला एक बुक्की मारली. यानंतर स्मिथ “तुझ्या घाणेरड्या तोंडाने माझ्या पत्नीचे नाव घेऊ नकोस” असे ओरडताना दिसला. (will smith punches chris rock on oscars 2022 stage for making fun of his wife)

दरम्यान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर, विल स्मिथने त्याच्या या कृतीबद्दल अकॅडमी आणि सहकारी नामांकित व्यक्तींची माफी मागितली. स्मिथ म्हणाला, “मी अकॅडमीची, माझ्या सहकारी नामांकित व्यक्तींची माफी मागतो. हा खूप सुंदर क्षण आहे.”

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा स्मिथचा चित्रपट ‘किंग रिचर्ड्स’ हा २०११ मध्ये प्रदर्शित झालेला स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना आणि व्हीनस विल्यम्स यांचे वडील आणि प्रशिक्षक रिचर्ड विल्यम्स यांचे चरित्र आहे, ज्यामध्ये विल स्मिथने प्रशिक्षक रिचर्डची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा