Friday, July 5, 2024

आर्यन खानला देण्यात आलीत विज्ञानाची पुस्तके, इतर आरोपींप्रमाणे त्यालाही मिळतंय नॅशनल हिंदू रेस्टॉरंटमधील जेवण

मुंबई क्रूझ अंमली पदार्थ पार्टी केसमध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, ७ ऑक्टोबरपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) कोठडीत आहे. आर्यनची मंगळवारी रात्री (२ ऑक्टोबर) उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानला इतर आरोपींसह एनसीबी कार्यालयाजवळील राष्ट्रीय हिंदू रेस्टॉरंटमधून जेवण दिले जात आहे. आर्यनच्या कुटुंबाकडून जेवण पुरवण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र ती नाकारण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, शाहरुख खान आणि गौरी देखील आर्यनला भेटायला आले होते. या दरम्यान, गौरीने आर्यनसाठी बर्गर आणला होता पण एनसीबीने त्याला ते देऊ दिले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनने एनसीबी लॉकअपमध्ये तपास संस्थेकडून काही विज्ञानाची पुस्तके मागितली होती, जी अधिकाऱ्यांनी दिली होती. आर्यनला त्याच रेस्टॉरंटमधून जेवण दिले जात आहे, जिथून बाकीच्या आरोपींसाठी जेवण येते. एनसीबीच्या ताब्यात असलेल्या सर्व आरोपींना एकत्र जेवण दिले जाते.

वडिलांना पाहून आर्यन खानला कोसळले रडू
माध्यमांतील वृत्तानुसार, शाहरुख खानला मुलाला भेटण्यासाठी एनसीबीची परवानगी घ्यावी लागली. अशी माहिती मिळाली आहे की, आर्यन खान वडिलांना पाहून रडू लागला. यावेळी दोघेही भावनिक झालेले पाहायला मिळाले.

१६ जणांना केलीय अटक
एनसीबीने मंगळवारी क्रूझ अंमली पदार्थ पार्टीच्या संदर्भात अटक केलेल्या चार जणांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अब्दुल कादिर शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या, अविन साहू या चार आरोपींना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठवले आहे. हे प्रकरण वाढताना पाहून दिल्ली, मध्यप्रदेश आणि गुजरात एनसीबीची टीमही तपासात मदत करण्यासाठी मुंबईला पोहोचली आहे. क्रूझवर अंमली पदार्थ पार्टीच्या संदर्भात एनसीबीने मंगळवारी गोपाल जी आनंद, समीर सहगल, मानव सिंघल आणि भास्कर अरोरा यांना अटक केली आहे. हे सर्वजण दिल्लीतील नमास क्रे नावाच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करतात. यासह, या प्रकरणात आतापर्यंत १६ लोकांना अटक करण्यात आली आहे.

आर्यनचा फोन पाठवलाय फॉरेन्सिक तपासासाठी
आर्यनला क्रूझमधून ताब्यात घेतल्यानंतर लगेचच त्याचा मोबाईलही अधिकाऱ्यांनी जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना व्हॉट्सॲप चॅट्सद्वारे अंमली पदार्थांविषयी अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आता अधिक माहिती मिळवण्यासाठी, आर्यन आणि इतर आरोपींचे मोबाईल गांधी येथील देशातील सर्वात मोठ्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. असा विश्वास आहे की, येत्या काही दिवसांमध्ये एनसीबी या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे करू शकते.

आर्यनचे प्रकरण वरिष्ठ वकील सतीश मानेशिंदे हाताळत आहेत. आर्यनला कोठडीतून वाचवण्यासाठी त्यांनी कोर्टात अनेक युक्तिवाद केले, पण न्यायालयाने आर्यनला आणखी तीन दिवस कोठडीत पाठवले. एनसीबीच्या रिमांडमध्ये असे म्हटले होते की, आर्यन खानच्या मोबाईलमध्ये फोटोंच्या स्वरूपात धक्कादायक आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या आहेत. एनसीबीने ११ तारखेपर्यंत पुढील कोठडीची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनच्या मोबाईलमधून चॅटिंग स्वरूपात अनेक लिंक्स सापडल्या आहेत, जे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे निर्देश करतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते २८ टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो

हे देखील वाचा