Sunday, June 8, 2025
Home मराठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ‘माझ्यासाठी हा…’

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ‘माझ्यासाठी हा…’

नुकतेच भारत सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केलेले आहेत. यामध्ये मराठी कलाकारांसाठी आणि चाहत्यांसाठी एका अभिमानाचा क्षण आहे. तो म्हणजे मराठीतील विनोदवीर आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. भारत सरकारने नुकतेच पद्म पुरस्काराची यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीतील अतुल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर झाल्याने संबंध महाराष्ट्राला गर्व झाला आहे.

पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. यावेळी ते म्हणाले की, “सर्वांचे खूप आभार. भावना अक्षरशः संबळून आल्या आहेत. महाराष्ट्र भूषण मिळाला तो राज्याचा झाला. आता सबंध भारताचा पुरस्कार मिळाला हे पुढचं पाऊल आहे. मला मनापासून आभार मानायचे आहे. तुम्हा सगळ्यांना आनंद झाला आहे याचा मला जास्त आनंद आहे. मी चांगलं काहीतरी करतोय यावर शिक्काच मिळाला आहे.”

यावेळी अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या म्हणाल्या की, “हा एकट्या अशोकचा सन्मान नाही. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकाचा सन्मान आहे. कारण त्यांनी नेहमीच अशोक आणि त्यांच्या अभिनयावर प्रेम केलं. अशोकने नेहमी एकाग्रतेने मेहनतीने अभिनय एके अभिनय केला. त्याची ही पोचपावती आहे. मी प्रेक्षकांची जनतेची आणि केंद्र सरकारची खूप ऋणी आहे. आम्हा सर्वा कुटुंबीयांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.”

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये कारकीर्द गाजवलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या अभिनयाचा झेंडा बॉलीवूड पर्यंत नेऊन ठेवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची यादी जाहीर; अशोक सराफसह ‘या’ दिगज्जांना मिळणार पुरस्कार
अर्जुन प्रताप बाजवा सारा अली खानला डेट करत आहे का? अभिनेत्याने सोडले मौन

हे देखील वाचा