अभिनेता आमिर खानच्या ‘गजनी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणारी अभिनेत्री असिन थोट्टमकल हिने लग्नानंतर आपल्या करिअरला अलविदा केले आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय दिसते. अशा परिस्थितीत असिनने मुलगी अरिनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. मुलगी अरिनच्या वाढदिवसाला सुपरहिरोची थीम ठेवण्यात आली होती. या अंतर्गत अभिनेत्री सुपरहिरो गेटअपमध्येही दिसली. विशेष म्हणजे तिने तिच्या मुलीच्या वाढदिवसाला तिला एक मौल्यवान बाहुली भेट देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
विशेष बाब म्हणजे, या थीममधील सर्व सुपरहिरो महिला होत्या, ज्यांचे कटआउट फोटोमध्ये पाहिले जाऊ शकते. लाल रंगाच्या पोशाखात आणि निळ्या मास्कमध्ये अरिन खूपच क्यूट दिसत होती. २४ ऑक्टोबरला अरिनचा वाढदिवस होता. अरिनचा हा वाढदिवस मोठ्या ग्राउंडमध्ये साजरा होत असल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत असिनने लिहिले की, “अरिन ४ वर्षांची झाली आहे.” तिने हॅशटॅगसह ‘आवर लिटल सुपरहिरो’ लिहिले आणि कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
या फोटोंशिवाय असिनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये असिनचा पती आपल्या मुलीसोबत खेळताना दिसत आहे. यावेळी त्याने निळा डेनिम आणि टी-शर्ट परिधान केला आहे. त्याने बेटमनचा मास्क घातला आहे. असिनने इंस्टा स्टोरीमध्ये सुपरहिरो थीमची संपूर्ण झलक चाहत्यांना दाखवली आहे. तिने केकचा फोटो शेअर केला आहे. हा केक बॅटमॅन आणि सुपरमॅन थीमवर आधारित आहे.
असिनने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये अरिनला दिलेल्या गिफ्टबद्दल खुलासा केला आहे. तिने अरिनच्या फोटोसोबत तिला दिलेल्या गिफ्टचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोत मार्वल सुपरहिरो वाल्कीरीची बाहुली दिसत आहे. अरिननेही तीच बाहुली हातात धरली आहे. या बाहुलीची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करेल. या बाहुलीची किंमत $ २७ ते $ ८४ पर्यंत आहे. भारतीय रुपयात ते अडीच हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत आहे.
असिनने ‘बोल बच्चन’, ‘लंडन ड्रीम्स’ आणि ‘रेडी’ सारख्या सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘दशावताराम्’, ‘शिवकाशी’सह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांच्याशी लग्न केल्यानंतर तिने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पहिल्याच चित्रपटाने झाली हिट, ‘असा’ होता ‘गजनी’ फेम असिनचा सिनेप्रवास
-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच
-बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम










