Saturday, April 20, 2024

पहिल्याच चित्रपटाने झाली हिट, ‘असा’ होता ‘गजनी’ फेम असिनचा सिनेप्रवास

बॉलिवूड अभिनेत्री असिन हिने तिच्या करिअरमध्ये अगदी मोजक्या चित्रपटात काम केले आहे. परंतु या चित्रपटाने तिने तिच्या चाहत्यांच्या मनात तिचे हक्काचे आणि अढळ स्थान निर्माण केले आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. तिने मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अशातच असिन मंगळवारी (२६ ऑक्टोबर) तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबाबत काही रंजक गोष्टी.

असिनचा जन्म २६ ऑक्टोबर १९८५ रोजी कोच्ची येथे झाला. तिने तिच्या अभिनयाची सुरुवात मल्याळम चित्रपटात केली होती. तिने २००१ साली चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यानंतर ती टॉलिवूडची क्वीन झाली. तिने तमिळ, तेलुगू चित्रपटात काम केले आहे. (Birthday special asin bollywood debut with Aamir Khan first movie break box record)

असिनने बॉलिवूडमध्ये आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटातून पाऊल ठेवले. या नंतर बॉलिवूडमध्ये सर्वत्र तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. साऊथमधील एका चित्रपटाचा ‘गजनी’ हा रिमेक होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटीपेक्षाही जास्त गल्ला केला होता. त्यानंतर असिन खूपच नावारूपाला आली.

या चित्रपटानंतर तिच्या आयुष्याला काही वेगळेच वळण मिळाले. तिला अनेक बॉलिवूड चित्रपटाच्या ऑफर आल्या. तिने सलमान खानसोबत ‘लंडन ड्रीम्स’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही जास्त कमाल केली नाही. परंतु प्रेक्षकांना सलमान आणि असिनची जोडी खूप आवडली होती. या नंतर त्या दोघांना पुन्हा एकदा ‘रेडी’ या चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटीपेक्षाही जास्त गल्ला केला. त्यानंतर ट्रेंडिंग अभिनेत्री म्हणून असिनचे नाव सर्वत्र झळकू लागले.

तिने बॉलिवूडमध्ये ‘हाऊसफुल २’, ‘बोल बच्चन’, ‘खिलाडी ७८६’, ‘ऑल इज वेल’ यांसारख्या चित्रपटात काम केले. यानंतर ती खूप लोकप्रिय झाली परंतु काही काळाने तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.

https://www.instagram.com/p/BFj3oKGDCSs/?utm_source=ig_web_copy_link

असीनने २०१६ साली मायक्रोसॉफ्टचे सीईओ राहुल शर्मासोबत लग्न केले. त्यानंतर ती चित्रपटात दिसली नाही. ती आता तिचा सगळा वेळ तिच्या कुटुंबाला देते. यासोबत तो सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय राहत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

-बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

-दिग्दर्शकाच्या ‘या’ मागणीवर प्राचीने केले स्वतःला व्हॅनिटीमध्ये बंद; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

हे देखील वाचा