प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘मध्ये, (Taarak Mehta Ka Ooltaah Chashmah) दयाबेनची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानीचे (Disha Vakani) चाहते गेल्या ५ वर्षांपासून तिची वाट पाहत आहेत. ती शोचा प्राण होती. तिची जेठालालसोबतची केमिस्ट्री आणि कॉमिक टायमिंग चाहत्यांना खूप पसंत होती. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर दिशा शोमध्ये परतेल असा अंदाज चाहत्यांना होता, पण आता ते शक्य होणार नाही.
दिशा वकानीच्या जागी दिसणार नवीन दयाबेन
होय, दिशा वकानी यापुढे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार नाही. मात्र, बऱ्याच दिवसांनी या शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत दुसरीच कोणीतरी दिसणार आहे. या शोचे निर्माते असित मोदी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना खुलासा केला आहे की, दिशा वकानी या शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार नाही. दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन्स सुरू आहेत, लवकरच नवीन अभिनेत्री दयाबेनची भूमिका साकारणार आहे. (asit modi has revealed about new dayaben)
‘दिशा वकानीचे पुनरागमन अपेक्षित होते’
असित मोदींनी मुलाखतीत असेही सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून दिशा या शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत वाट पाहत होती. तिने गरोदरपणात प्रसूती रजा घेतली होती, त्यानंतर ती शोमधून गायब आहे. निर्माते म्हणाले, “आम्हाला दिशाची जागा घ्यायला खूप वेळ लागला, कारण दिशाने लग्नानंतर काही काळ काम केले. तिने नंतर प्रसूती रजा घेतली आणि नंतर बाळाची काळजी घेण्यासाठी ब्रेक सुरू ठेवला. तिने काम कधीच सोडली नाही. आम्हाला आशा होती की दिशा परत येईल, पण नंतर साथीचा रोग आला. आम्ही सावधगिरीने शूटिंग करत होतो, पण त्यावेळी दिशाला साथीच्या आजारात शूट करण्याची भीती वाटत होती.”
असित मोदी पुढे म्हणाले की, “साथीच्या आजारानंतर मी दिशा वकानीच्या शोमध्ये परत येण्याची वाट पाहत होतो, पण आता ती येऊ शकत नाही.” ते म्हणाले, “आम्ही तिची वाट पाहण्याचे ठरवले होते, कारण तिचा या शोशी बराच काळ संबंध आहे. ती कुटुंबासारखी आहे.” अलीकडेच, तिला दुसरे अपत्य झाले आणि आता ती शोमध्ये परत येऊ शकणार नाही. आम्ही नवीन दयाबेनच्या शोधात आहोत, असेही निर्माते यावेळी म्हणाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा