यंदा कर्तव्य आहे! ‘ही’ अभिनेता-अभिनेत्रीची जोडी लवकरच चढणार बोहल्यावर, केळवणाचे फोटो वायरल


सध्या मराठी चित्रपटसृष्टीतून सनई चौघड्यांचे सूर एकामागोमाग एक ऐकू येत आहे. आताच प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो येत
नाही तोपर्यंत दुसरी जोडी लगीनगाठ बांधायला सज्ज झाली आहे. ही नवीन जोडी आहे अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांची.

नुकताच या दोघांच्या केळवणाचा कार्येक्रम पार पडला. त्यांच्या या केळवण समारंभाचे काही फोटो अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती मेघा धाडे हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेयर केले आहेत. हे फोटो फारच कमी वेळात वायरल झाले असून फॅन्सकडून या गोड जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मेघाने शेयर केलेल्या या फोटोंमध्ये मध्ये शिल्पा नवलकर आणि शाल्मली टोळ्ये या दोघी देखील दिसत आहे.

मी स्वप्नालीसोबत रिलेशमध्ये असल्याची कबुली देत आस्तादने बिग बॉसच्या घरात त्याची लव्हस्टोरी सांगितली होती. काही वर्षांपूर्वी एका मालिकेचा एक पायलट भाग चित्रित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात आस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण अशी भूमिका साकारत होते. त्यानंतर तीन-चार वर्षांनी दोघांनी ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला. त्यानंतर आस्ताद आणि स्वप्नालीची जोडी चर्चेत आली. ते दोघेही सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करताना दिसतात.

सिद्धार्थ चांदेकर, आशुतोष कुलकर्णी, अभिज्ञा भावे, मानसी नाईक, प्राजक्ता परब यांच्या मागोमाग आता अभिनेता आस्ताद काळे स्वप्नाली पाटील सोबत विवाहबंधनात अडकणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.