Wednesday, April 29, 2026
Home बॉलीवूड ऑस्ट्रेलियन मंत्री शाहरुख खानच्या या चित्रपटाचे फॅन; आवडत्या चित्रपटाबाबतची सांगितली गोष्ट

ऑस्ट्रेलियन मंत्री शाहरुख खानच्या या चित्रपटाचे फॅन; आवडत्या चित्रपटाबाबतची सांगितली गोष्ट

शाहरुख खान हा एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपट केले. आणि प्रेक्षकांना ते भावले सुद्धा, त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करून आहेत, तर शाहरुख खान हा त्या काही मोजक्या बॉलिवूड स्टार्सपैकी एक आहे, ज्यांना जगभरातून प्रेम मिळते. भारताबाहेरही शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत, ज्यांना त्याचे चित्रपट खूप आवडतात. अलीकडेच, एका ऑस्ट्रेलियन मंत्र्यानेही शाहरुख खानबद्दल आपली प्रशंसा व्यक्त केली. 

ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क यांनी अलीकडेच खुलासा केला की ते शाहरुख खानचे (Khan)खूप मोठे चाहते आहेत आणि ‘ओम शांती ओम’ हा त्यांचा सर्वकालीन आवडता चित्रपट आहे. हा चित्रपट 2007 मध्ये जरी रीलीज झाला असला तरी आजहि अनेक लोक या चित्रपटाचे चाहते आहेत. तर हा चित्रपट शाहरुख आणि दिपीका अभिनीत होता. तसेच यातील गाण्याचेही अनेक प्रेक्षक चाहते आहेत. तर ‘इंडियन लिंक’ पॉडकास्टवर  संभाषणात टोनी बर्क यांनी बॉलिवूडबद्दलची आपली आवड व्यक्त केली. त्यांनी सुपरस्टार शाहरुख खानबद्दलची आपली प्रशंसा व्यक्त केली.

टोनी बर्क यांनी पुढे अनेक चित्रपटाचा उल्लेख केला जसे की,  ऐश्वर्या राय बच्चन आणि हृतिक मअभिनीत ‘जोधा अकबर’ या चित्रपटाची प्रशंसा करत त्याला एक विलक्षण चित्रपट म्हटले. मात्र ते म्हणाले की ‘ओम शांती ओम’ हा काळातील चित्रपट आहे. आणि तो मला खुप आवडतो.  म्हणजेच ‘ओम शांती ओम’ हा भारतीय लोकाचा आवडता चित्रपट आहेच पण  या चित्रपटाचे भारताबाहेर देखील चाहते असल्याचे दिसुन येते

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘रामायण’मधील निरागस सीता आता काय करते? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिची कहाणी

हे देखील वाचा