Monday, July 1, 2024

जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली त्याच्या फिल्मी करिअरपेक्षा बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणामुळे जास्त चर्चेत राहिला. जिया खानने लहान वयात ३ जून २०१३ रोजी जुहू येथील तिच्याच घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. जियाच्या कुटुंबीयांनी अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली याला जबाबदार असल्याचे सांगितली होते. अलीकडेच, जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोलीचा खटला विशेष सीबीआय न्यायालयात पाठवण्यात आला होता. नुकतेच यावर आता अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

जिया खानच्या मृत्यू प्रकरणाचा खटला आता सीबीआयच्या विशेष न्यायालयात नेण्यात आल्यानंतर, सूरज पांचोली म्हणाला की, तो थोडा समाधानी आहे. या विषयावर बोलताना सूरज पांचोलीने एका मुलाखतीत सांगितले की, गेली आठ वर्षे त्याच्यासाठी खूप कठीण होती. या प्रकरणामुळे त्याची चित्रपटसृष्टीतील इमेजही खराब झाली आहे. सूरज पांचोलीचे म्हणणे आहे की, दोषी ठरल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे. मात्र, दोषी सिद्ध न झाल्यास आरोपातून मुक्त केले जावे. सूरज पांचोलीच्या कुटुंबीयांना आशा आहे की, आता न्यायालय त्याच्या खटल्याला वेग देईल.

सूरज पांचोली एका मुलाखतीत म्हणाला की, “आता मला थोडा आराम मिळाला आहे. कारण, सुरुवातीपासूनच मला वाटत होते की, माझे प्रकरण विशेष सीबीआय न्यायालयात असावे. उशीर झाला, पण आता ते सीबीआय न्यायालयात आला आहे. जर न्यायालयाने सुनावणी दरम्यान मला दोषी ठरवले, तर मला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु निर्दोष सिद्ध झाल्यास, मी या आरोपांपासून मुक्त होण्याचा हक्कदार आहे. गेल्या ८ वर्षात माझी इमेज खूपच खराब झाली आहे. हा काळ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण गेला आहे. कारण, उद्योग आणि माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी एक धारणा आहे. मात्र, ही धारणा मला हवी तशी नाही.”

सूरज पुढे म्हणाला की, “मला माहित नाही की, मी गेल्या आठ वर्षांपासून कसा जिवंत आहे. मात्र, माझ्या कुटुंबाने मला त्या कठीण काळात पाहिले आहे. मी इतक्या वर्षांपासून या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. माझे ध्येय फक्त पुढे पाहणे आणि पुढे जाणे आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला आशा आहे की, सीबीआय न्यायालय खटल्याचा लवकर निकाल लावेन.” जिया खानच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी सूरजवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला शिव्या देणे सोपे आहे, कारण मी एकटीच आहे, पण…’, अश्लील कंटेंट प्रकरणात गेहना वशिष्ठचे विधान

-करण जोहरला खूप सतावते मुलं यश- रुही यांच्याबद्दल ‘ही’ भीती; मुलाखतीत स्वत: केले उघड

-जेव्हा विद्या बालनला भिकारी समजून एका व्यक्तीने हातात ठेवले सुट्टे पैसे; काही काम धाम करण्याचाही दिला होता सल्ला

हे देखील वाचा