Friday, March 29, 2024

‘मला शिव्या देणे सोपे आहे, कारण मी एकटीच आहे, पण…’, अश्लील कंटेंट प्रकरणात गेहना वशिष्ठचे विधान

नुकतीच बातमी समोर आली होती की, एका मॉडेलने राज कुंद्राच्या कंपनीतील चार प्रोड्युसर्सच्या विरोधात प्राथमिक अहवाल दाखल केला होता. त्यात एक नाव ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गेहना वशिष्ठचही आहे. मात्र गेहना वशिष्ठने स्वतःवरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. तिने सांगितले की नवीन एफआयआरमध्ये तिचं नाव आहे, ज्या विरोधात तिने शनिवारी रात्री शेवटचा जामीन अर्ज दाखल केला. गेहनाने एक स्टेटमेंट रिलीझ केलं आहे. त्यात तिने मीडियावर सुद्धा टीका केली आहे, ज्यांनी तिचं नाव नवीन एफआयआरमध्ये असल्याचं सांगितलं होतं.

गेहनाने ती चार्जशीट सुद्धा दाखवली, ज्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. स्पष्टीकरण देत गेहना म्हणाली की, “माझ्या चार्जशीटमध्ये स्पष्ट स्वरूपात लिहिले आहे, की सहा तारखेला क्राईम ब्रांचने मला बोलावलं होत. त्यानंतर त्यांनी एफआयआर लिहिली आणि मला अटक केली. माझ्या विरोधात फक्त एक तक्रार दाखल आहे, जी पोलिसांकडून लिहिली गेली आहे. मी हवेत बोलत नसून माझ्याकडे याचे पुरावे आहेत.”

चुकीच्या पद्धतीने नाव खराब केलं जातंय
पॉर्न व्हिडिओच्या शूटिंग सेटवर असण्याच्या विधानाला पूर्ण विराम देत गेहनाने सांगितले की, “कोणत्याच शूटिंग सेटवर मी नव्हते. त्या पीडितांचे व्हिडिओ पाहा जे सेटवरून मिळाले आहेत. कोणीच माझं नाव घेतलं नाही कारण मी तिथे नव्हते. क्राईम ब्रांचच्या सीनिअर पोलिस ऑफिसरचे व्हिडिओ पाहा, ज्यात एक महिला आपल्या वकीलासोबत बसून बोलत आहे की हे सगळ कसं घडलं. तिने सुद्धा माझं नाव घेतलं नाही, तरी पण काही मीडियावाले गेहना गेहना म्हणून माझं नाव घेत आहेत. कारण की चुकीच्या पद्धतीने माझं नाव या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे.”

गेहनाने तिच्या विरोधात बोलणाऱ्या मॉडेल्सवरही निशाणा साधला आहे. तिने सांगितले की, “जेव्हा मला माझ्या कंपनीसाठी आर्टिस्टची गरज भासते, तेव्हा मी त्याविषयी फेसबुकवर पोस्ट करते. याचा अर्थ स्पष्ट आहे, की मी कोणत्याच कलाकाराला शूटच्या आधी किंवा नंतर भेटत नाही.”

ती पुढे म्हणाली की, “ज्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली आहे, त्यांनी पन्नासपेक्षा जास्त अश्लील चित्रपट केले आहेत. तर मी कोण आहे त्यांना जबरदस्ती करणारी. मी कसं काय कोणाला जबरदस्ती करू शकते, कारण तेव्हा सेटवर पन्नासपेक्षा जास्त लोक उपस्थित असतात आणि मी कधीच पॉर्न फिल्म शूट केली नाही. एक महिला दुसऱ्या महिलेचा रेप करू शकते का? सगळे म्हणतात की मी पन्नास लोकांसमोर फोर्स केला आणि रेप होताना पाहत राहिले. मला शिव्या देणे खूप सोपे आहे. कारण की मी एकटीच आहे.” पुढे ती असेही म्हणाली, की तिच्या विरोधात कोणाकडे पुरावे आहेत का?  “माझ्या कडे खूप पुरावे आहेत की, मी चुकीची नाही आणि मी काहीच चुकीचं केलेलं नाही,” असेही गेहना म्हणाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

हे देखील वाचा