Monday, June 17, 2024

करण जोहरला खूप सतावते मुलं यश- रुही यांच्याबद्दल ‘ही’ भीती; मुलाखतीत स्वत: केले उघड

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निर्माता म्हणून प्रसिद्ध असणारा करण जोहर नेहमीच मीडियामध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो. करण हा जेवढा बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे तेवढाच तो टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये देखील लोकप्रिय आहे. टीव्ही आणि करणचे नाते खूपच जुने आहे. अनेक रियॅलिटी शोमध्ये तो परीक्षक म्हणून दिसला आहे. आता तर करण टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधल्या सर्वात मोठ्या आणि विवादित शोचे सूत्रसंचालन करताना देखील दिसणार आहे.

बिग बॉसचे हे पर्व सुरुवातीचे काही दिवस ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणार आहे. ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या या शोचे सूत्रसंचालन करण जोहर करणार आहे. या शोमध्ये सर्व स्पर्धकांना एका घरात बंद करण्यात येईल, संपूर्ण जगाशी संबंध तोडून एकाच घरात २४ तास राहणाऱ्या या स्पर्धकांना शो जिंकण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करावी लागणार आहे. या शोच्या निमित्ताने करणला त्याच्या सर्वात मोठ्या भीतीबद्दल विचारण्यात आले. (karan johar biggest fear related to twins roohi and yash)

या प्रश्नाला उत्तर देताना करण म्हणाला, तो त्याच्या मुलांपासून यश आणि रुहीपासून जास्त वेळ दूर राहू शकत नाही. जेव्हा मला त्यांना सोडून जास्त वेळ राहावे लागते तेव्हा मला असे वाटते की, मी जगूच शकत नाही. माझे मुलंच माझी ताकद आणि तेच माझी कमजोरी देखील आहे. करणला सरोगसीचा माध्यमातून ७ फेब्रुवारी २०१७ रोजी एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळे मुलं झाले आहेत.

करण नेहमीच त्याच्या मुलांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. करणची आई आणि रुही, यश यांचे बॉंडिंगही या व्हिडिओ, फोटोंमधून दिसते. लॉकडाउनच्या काळात त्याने ‘लॉकडाऊन विथ द जोहर्स’ हा हॅशटॅग वापरून अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. करण अनेकदा त्याच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसतो.

करणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तो बऱ्याच काळाने सिनेमा दिग्दर्शित करताना दिसणार आहे. तो लवकरच रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासोबत ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. या सिनेमात या दोघांसोबत शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

हे देखील वाचा