Wednesday, June 26, 2024

मुंबईच्या या 4BHK अपार्टमेंटमध्ये पती केएल राहुलसोबत राहते अथिया शेट्टी, पाहा आलिशान घर

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya shetty)आज ( ५ नोव्हेंबर) रोजी तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले आहे. अथिया आणि राहुल दोघेही एका आलिशान घरात राहतात. आज वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या आलिशान घराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री अथिया शेट्टी चित्रपटांमध्ये फारशी यशस्वी ठरली नसावी. मात्र ती सोशल मीडियावर तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते. त्याच्या मुंबईतील आलिशान घराची झलक दाखवत आहोत.

अथिया शेट्टी पती केएल राहुलसोबत मुंबईत 4-BHK सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहते. जे आतून खूप सुंदर आणि विलासी आहे. अथिया आणि राहुल अनेकदा त्यांच्या सुंदर घराचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करतात.

वृत्तानुसार अथियाच्या घराची सजावट तिच्या आईने म्हणजेच माना शेट्टीने केली आहे. मानाने आपल्या मुलीच्या घराचा प्रत्येक कोपरा अतिशय सुंदरपणे सजवला आहे.

अथिया आणि राहुलच्या घराला एक सुंदर अशीबाल्कनी आहे. जी फक्त खूप मोठी नाही तर येथून समुद्राचे एक अतिशय सुंदर दृश्य दिसते.

घराच्या बाल्कनीत निसर्गाचे सौंदर्य आणि ताजेपणा अनुभवण्यासाठी आरशाच्या रेलिंगसह बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

एवढंच नाही तर अथियाचा पती केएल राहुलचंही बंगळुरूमध्ये खूप सुंदर घर आहे. त्याची आतून सुंदर सजावटही करण्यात आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

ओटीटीने सांभाळली ‘या’ कलाकारांची करिअरची डुबती नाव, वाचा यादीतील नावे
‘या’ दिवशी सिंधुदुर्गात रंगणार ‘कोकण चित्रपट महोत्सव’; एकदा वाचाच

हे देखील वाचा