Tuesday, March 5, 2024

“बुरखा घातलाय का?”, म्हणत अथिया शेट्टीला साेशल मीडिया युजर्सने केले ट्राेल, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी सध्या चर्चेत आहे. ती नुकतीच मुंबईतील एका कार्यक्रमात दिसली. पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये अथिया खूपच सुंदर दिसत होती. मात्र, काहींना तिचा लूक आवडला नाही. अशात अनेक युजर्सनी ती बुरखा घालून आल्याचेही म्हटले आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

अथिया शेट्टी (athiya shetty) पांढऱ्या रंगाचा वनपीस शोल्डर गाऊन घालून या कार्यक्रमात आली होती. यावेळी तिने पॅपराझींसमोर अनेक पोजही दिल्यात. मात्र, लोक ती ज्या पद्धतीने एक्सप्रेशन देत होती त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीच्या लूकची खिल्ली उडवत आहे आणि तिला माेठ्या प्रमाणात ट्राेल करत आहे.

अथिया शेट्टीच्या व्हिडिओवर युजर्स विचित्र कमेंट करत आहेत. एकाने युजरने कमेंट करत लिहिले की,”तिचा चेहरा मुलींसारखा नाही, तर तिचा चेहरा सुनील शेट्टीसारखा आहे, तिला पाहून अजिबात गर्ल्सच्या फीलिंग येत नाही.”, तर दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले की, “काय बोलावे कळत नाही. हाईट बॉडी चांगली आहे, पण क्वचितच तिला कुठला पोशाख शोभतो. तिने साडी आणि सलवार सूट परिधान केले पाहिजे. त्यात ती सुंदर दिसेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्सनी सहभागी होऊन चार चांद लावले. श्वेता बच्चन, अनन्या पांडे, सोनम कपूर, खुशी कपूर, कनिका कपूर, रेखा, विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक सेलेब्स यावेळी स्पाॅट झाले. (bollywood actress athiya shetty at dior fashion gala held at gateway of india netizens troll her watch)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोट्यवधी खर्च करून रामानंद सागर यांनी बनवलेल्या रामायणातून किती झाली कमाई आहे का माहिती? घ्या जाणून

मैं हूं ना सिनेमातील ‘त्या’ खास भूमिकेसाठी शाहरुख खानने ट्रिक वापरत सतीश शहा यांना केले होते तयार

हे देखील वाचा