Wednesday, June 26, 2024

केएल राहुलसोबतच्या लग्नाच्या बातमीवर अथिया शेट्टीने सोडले मौन, बोलली ‘असे’ काही

सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) यांच्यातील नाते आता कोणापासून लपलेले नाही. दोघांनीही त्यांच्या नात्याचा खुलेपणाने स्वीकार केला आहे, तेव्हापासून त्यांच्या लग्नाबद्दल सतत चर्चा होत आहे. दोघेही लवकरच सात फेरे घेऊ शकतात, अशी बातमी नुकतीच समोर आली होती. दरम्यान, स्वत: अथियाने तिच्या लग्नाचा उल्लेख करत मौन तोडले आहे.

सोशल मीडियावर लग्नाच्या बातम्या पसरत असताना अथिया शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की, “मला आशा आहे की मला ३ महिन्यांत होणाऱ्या लग्नासाठी आमंत्रित केले जाईल.” सुनील शेट्टीनेही मुलीच्या लग्नाच्या बातमीवर वक्तव्य केले आहे. नुकतेच त्याला लग्नाच्या तयारीबद्दल विचारले असता तो म्हणाला, “नाही, अजून असे काहीही ठरलेले नाही.” (athiya shetty on her wedding with kl rahul actress reacted to news)

हे कपल गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. दोघांनीही गेल्या वर्षीच जगासमोर त्यांच्या नात्याची कबुली दिली होती, जेव्हा क्रिकेटर अहान शेट्टीच्या पदार्पण चित्रपट ‘तडप’च्या स्क्रिनिंगला शेट्टी कुटुंबासोबत पोहोचला होता.

अथिया आणि राहुल यापूर्वी एकत्र जर्मनीला गेले होते, जिथे राहुलच्या मांडीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या ट्रिपनंतर अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जाऊ लागला की, अथिया आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अहवालात असेही म्हटले होते की, लग्न पुढील तीन महिन्यांत होऊ शकते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा