Monday, June 17, 2024

लहानपणी सुनील शेट्टीला पाहून, ‘मेरे दो-दो बाप’ म्हणायची अथिया शेट्टी; ऐकून चकित झाला होता अभिनेता

चित्रपटाच्या पडद्यावर जेव्हा जेव्हा सुनील शेट्टीची (Suniel Shetty) एन्ट्री होते, तेव्हा वातावरण पूर्णपणे बदलूनच जाते. आता सुनीलचा वारसा पुढे नेण्यासाठी त्याच्या मुलांनीही फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले आहे. अथिया शेट्टीने (Athiya Shetty) आधीच पदार्पण केले होते आणि यावर्षी अहान शेट्टीनेही (Ahan Shetty) अभिनय विश्वात पाऊल ठेवले आहे.

सुनीलने मुलगी अथियाबद्दल केला खुलासा
सुनील शेट्टीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट दिले आहे. सुनील शेट्टीची फॅन फॉलोविंगही खूप जास्त आहे. अभिनेत्याला अथिया आणि अहान अशी दोन मुले आहेत. सुनील त्याच्या मुलीच्या खूप जवळ आहे आणि याबद्दल त्याने अनेकदा मुलाखतींमध्ये उघड केले आहे. पण साधी दिसणारी अथिया शेट्टी लहानपणी तिच्या वडिलांना अशा काही गोष्टी बोलायची, जे कोणीच आपल्या वडिलांना म्हणणार नाही. (athiya shetty used to say to suniel shetty mere do do baap)

 सुनीलला दुसरा पिता मानायची अथिया
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अथिया शेट्टी तिचे वडील सुनील शेट्टीला दुसरे वडील मानत होती. ‘मेरे दो-दो पापा’ असे ती नेहमी म्हणायची. विशेष म्हणजे, हे बोलण्याचे कारण देखील तिचे वडीलच आहेत. खरं तर, १९९४ मध्ये अभिनेता सुनील शेट्टीचा ‘गोपी-किशन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या, एकाचे नाव गोपी आणि दुसऱ्याचे नाव होते किशन. या चित्रपटाचा एक डायलॉग खूप गाजला. तो डायलॉग होता ‘मेरे दो-दो बाप’. त्यामुळे अथिया शेट्टीही त्याला ‘मेरे दो-दो बाप’ म्हणू लागली.

‘मेरे दो-दो बाप’
साल ३०१९ मध्ये ‘गोपी-किशन’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सुनीलने सांगितले होते की, ‘गोपी-किशन’ चित्रपटाचा ‘मेरे दो-दो बाप’ हा डायलॉग हिट होईल याची त्याला स्वतःला कल्पना नव्हती. घरात हा डायलॉग ऐकून अभिनेता स्वतः कंटाळला होता. सुनीलने सांगितले की, अथिया शेट्टी त्याला पाहताच ‘मेरे दो-दो बाप’ म्हणायची. यावर सुनील अथियाला समजावून सांगत होता की, हे बरोबर नाही आणि यात काही गंमतही नाहीये.

अथिया शेट्टीचे चित्रपट
अथिया शेट्टीला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची आवड होती. मात्र, तिचा एकही चित्रपट आतापर्यंत हिट झालेला नाही. अथियाने ‘हीरो’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर अभिनेत्रीने ‘नवाबजादे’, ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले. पण या चित्रपटांनीही थिएटरमध्ये विशेष काही केले नाही.

हेही वाचा-

हे देखील वाचा