Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड अक्षय कुमारने ‘अतरंगी रे’चे मोशन पोस्टर्स केले शेअर, धनुष-साराच्या भूमिकेचा झाला खुलासा

अक्षय कुमारने ‘अतरंगी रे’चे मोशन पोस्टर्स केले शेअर, धनुष-साराच्या भूमिकेचा झाला खुलासा

‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या यशानंतर अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘अतरंगी रे’ या आगामी चित्रपटाचे तीन मोशन पोस्टर शेअर केले आहेत. त्यापैकी एक त्याचे मोशन पोस्टर आहे. दुसरे धनुषचे आणि तिसरे सारा अली खानचे आहे. तिघांच्याही मोशन पोस्टरमध्ये तिघांचेही वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत. या मोशन पोस्टरसह, त्याने सांगितले की, चित्रपटाचा ट्रेलर बुधवार (२४ नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे.

अक्षयने सारा अली खानचा पहिला मोशन शेअर केला आहे. त्याच्या पार्श्वभूमीत एक संगीत देखील वाजत आहे. यामध्ये साराचे तीन वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत. हे शेअर करत त्याने लिहिले की, “एक मुलगी.. प्रेमात वेडी, अतरंगी नंबर वन रिंकूला उद्या भेटा. ‘अतरंगी रे’चा ट्रेलर उद्या डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.”

अक्षयने धनुषचे दुसरे मोशन पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये धनुषचे तीन वेगवेगळे लूक दिसत आहेत. हे शेअर करत त्याने लिहिले की, “या प्रेमकथेला अतरंगी नंबर २ सोबत भेटा, ज्याचे नाव विशू आहे.” त्याचवेळी अक्षयने त्याचा तिसरा मोशन शेअर केला आहे. यामध्ये अक्षयही तीन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. हे शेअर करत त्याने लिहिले की, “प्रेमाच्या वेडेपणाबद्दल एक विचित्र कथा. या कथेत जादू जोडणारा तुमचा विश्वसनीय.”

अक्षय कुमारने या मोशन पोस्टर्सद्वारे चित्रपटातील धनुष आणि सारा अली खानच्या पात्रांचा खुलासा केला आहे. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या मोशन पोस्टर्सवरून हा चित्रपट प्रेमाच्या वेडेपणावर असल्याचे लक्षात येते. चित्रपटाचे मोशन पोस्टर खूपच सुंदर आहेत. या तिन्ही स्टार्सची चित्रपटातील झलक दाखवण्यात आली आहे. मोशन पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘अतरंगी’मध्ये हे तिन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. सारा अली खान आणि अक्षय कुमार यांना एकत्र काम करताना पाहणे चाहत्यांसाठी खूप रिफ्रेशिंग असेल. दुसरीकडे, साऊथचा मेगा स्टार धनुष बऱ्याच दिवसांनी हिंदी चित्रपटात दिसणार आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या धनुषला सारा-अक्षयसोबत स्क्रीन शेअर करताना पाहणे खूप आनंददायी ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…

हे देखील वाचा