Wednesday, July 3, 2024

ठरलं रे! ‘या’ चित्रपटात दिसणार सीमा-सचिनची लव्हस्टोरी; एकदा वाचाच

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं,’ असं अनेक जण म्हणतात. प्रेमाची गोष्टच वेगळी असते. प्रेमासाठी अनेक तरून पिढी कधी काय करेल याचा काही नियम नाही. काही दिवसांपुर्वी सीमा हैदर पाकिस्तानमधून प्रियकरासाठी भारतात आली. सीमा हैदर आणि सचिनची प्रेम कहाणी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

पबजी खेळता खेळता सीमा हैदर (Seema Haider) व सचिन यांची भेट झाली. तिथेच त्यांची मैत्री झाली त्या मैत्रीच रुपांतर प्रेमात झाल. प्रेमासाठी सीमा देश सोडून आली. पाकिस्तानची सीमा हैदर आपल्या प्रियकराला भेटायला भारतात आली आणि येताना चार मुलांना घेऊन आली आहे. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले. त्याच्या या प्रेम कथेची चर्चा संपूर्ण भारतामध्ये रंगली. सीमा हैदर व सचिन नुकतेच एक गाणं देली निघाल आहे. हे गाणं देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्याला देखील लोकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

यादरम्यान, सीमा चित्रपटाच काम करणार असल्याचे बोलले जात होते. आता सर्वांसाठी एक आनंदची बातमी समोर आली आहे. सीमा एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमाबाबत काही लोक त्यांच्या समर्थनात आहेत तर काही लोक त्यांच्या विरोधात आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये सीमा हैदरचे नाव इतके प्रसिद्ध झाले आहे की, आता दिग्दर्शक तिच्यावर एक नाही तर दोन चित्रपट बनवणार आहेत.

सीमा आणि सचिनच्या प्रेमावर बनणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘कराची टू नोएडा’ आहे. जानी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अमित जानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे काम वेगाने सुरू आहे. निर्मात्यांनी चित्रपटासाठी ऑडिशन घेणे सुरू केले आहे. अमित जानी लवकरच या चित्रपटाचे थीम साँग रिलीज करणार असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटाचे पोस्टरही समोर आले आहे. ज्यावर ‘कराची टू नोएडा’ असे मोठ्या थाटात लिहिले आहे.

‘कराची टू नोएडा’ पुढील वर्षी 2024 मध्ये रिलीज होणार आहे. मात्र, याआधी सीमा हैदरवर आणखी एक चित्रपट बनवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये तिला अभिनयाची ऑफरही आली आहे. पहिल्या चित्रपटात सीमाला रॉ एजंटची भूमिका देण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘ए टेलर मर्डर स्टोरी’ असे असेल. फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाच्या संदर्भात सीमा हैदर यांच्यासोबत बैठकही घेतली आहे. (Auditions for ‘Karachi to Noida’ to be made on Seema Hyder and Sachin love story)

अधिक वाचा-  
हवा में उडता जाये… कियारा अडवाणीच्या मनमोहक अदांवर चाहते फिदा!
जेष्ठ विचारवंतांच्या निधनावर किरण माने यांची भावूक पोस्ट; म्हणाले, ‘रक्तबंबाळ झालं होतं पण…’

हे देखील वाचा