Thursday, June 13, 2024

पाकिस्तानी सीमा हैदर हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार? ‘या’ निर्मात्याने दिली ऑफर

गेल्या काही दिवसांपासून देशात ‘सीमा हैदर आणि सचिन’ या दोघांची जोरदार चर्चा सुरू आहे. एखाद्या फिल्मी स्टाईलने सीमा हैदर पाकिस्तानमधून भारतात आली. आपल्या प्रियकराला भेटायला ते पण एकटी नाही सोबत चार मुलं घेऊन आली आहे. आता सीमा आणि सचिन यांना चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

झालं असं की, पबजी हा गेम खेळता खेळता सीमा हैदर आणि सचिनची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. शेवटी सीमा आपल्या चार मुलांसह पाकिस्तानमधून भारतात आली आणि सचिन बरोबर लग्न केले. ‘गदर २’ या चित्रपटाच्या आधी सीमा व सचिनची प्रेमकहाणी चांगलीच गाजतं आहे. हा सर्व प्रकार एखाद्या सिनेमाच्या कथेला भारी पडेल. पण सीमा ही पाकिस्तानी असल्याने काही दिवसांपासून या तिची सातत्याने चर्चा येत आहे. तिच्यावर गुप्तहेर असल्याचा संशय असल्याने तपासही सुरू आहे.

सचिन व सीमाची (Seema Haider) आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. दोघांनाही कामासाठी बाहेर जाता येत नसल्याने ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. तर आता उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सीमा व सचिनला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. अमित जानी म्हणतात की, सीमा आणि सचिनला ऑफर दिली आहे. त्यांनी त्यांच्या प्रॉडक्शनमध्ये काम केले तर त्या कामाच्या बदल्यात या जोडप्याला पैसेही भेटतील. तसचे सीमा हैदर ज्या पद्धतीने भारतात शिरली, त्याचं आपण समर्थन करत नसल्याचं अमित यांनी स्पष्ट केलंय. पण आता त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही अडचण आल्याचं कळाल्यावर त्यांना मदत करणे भारतीय म्हणून आपले कर्तव्य आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

अमित यांनी त्यांचे फिल्म प्रॉडक्शन हाऊस ‘जानी फायर फॉक्स’ या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटात काम करण्याची ऑफर सीमा व सचिन या जोडप्याला दिली आहे. अमित जानी यांनी नुकतेच मुंबईत चित्रपट प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. त्याचे नाव ‘जानी फायर फॉक्स’ आहे. उदयपूरमधील शिंपी कन्हैया लाल साहूच्या हत्येवर अमित चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अ टेलर मर्डर स्टोरी’ असे ठेवण्यात आले असून तो नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Amit Jani offered Pakistani Seema Haider to act in Hindi film)

अधिक वाचा- 
दीपिकाचा बिकिनीतील लूक पाहून नवराही झाला खल्लास; म्हणाला, ‘हा चांगला इशारा…’
दारूच्या व्यसनात बुडालेल्या मीना कुमारी यांचा ‘असा’ झाला मृत्यू, औषधाऐवजी प्यायच्या दारू

हे देखील वाचा