Friday, July 5, 2024

हिंदी चित्रपटांमध्ये होळीची सुरुवात केली ‘या’ चित्रपटाने, दिग्दर्शक मेहबूब खान यांनी सुरु केला हा ट्रेंड

भारतामध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यापैकीच एक असलेला सर्वांचा आवडता सण म्हणजे होळी. होळीच्या सणात भारतात खूप आनंद आणि जल्लोष असतो. देशभरातील लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. अनेक ठिकाणी तर आठवडाभर रंग खेळले जातात. होळी जगभरात वेगवेगळ्या अंदाजात आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. होळी सण साजरा करण्यासाठी जगभरातून लोक भारतात येतात. रंगांचा हा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ऑनस्क्रीन असो की, ऑफस्क्रीन, कलाकार होळी रंगांच्या या सणाची मजा आणखीनच वाढवतात. चला तर मग बॉलिवूडच्या होळीशी संबंधित काही मजेदार गोष्टी जाणून घेऊया.

बॉलिवूडमध्ये ज्या काळापासून ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांचा जमाना होता तेव्हापासून होळीचा सण साजरा केला जातो. पहिला चित्रपट ८२ वर्षांपूर्वी म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी प्रदर्शित झाला होता. १९४० मध्ये ‘औरत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातच पहिल्यांदा होळीचा सण साजरा करताना दाखवण्यात आला होता. या चित्रपटात होळी साजरी झाली असली तरी खरे रंग पाहायला मिळाले नाहीत. हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात सरदार अख्तर, सुरेंद्र, याकुब आणि कन्हैया लाल यांचा सहभाग होता. १९५७ मध्ये मेहबूब खान यांनी मदर इंडियाच्या नावाने हा चित्रपट रिमेक केला, हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

स्वातंत्र्यापूर्वी बॉलिवूड चित्रपटांमधील होळी

अशा परिस्थितीत १९५२ हे वर्ष होते जेव्हा बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा रंगीत होळी खेळली गेली. म्हणजे पाहिलं तर ती चित्रपटांची पहिली रंगीत होळी होती. त्या चित्रपटाचे नाव ‘आन’ होते. बर्‍याच अर्थांनी हा एक मोठा चित्रपट होता. दिलीप कुमार यांनी या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटात दिलीप कुमार आणि निम्मी खूप होळी खेळताना आणि मस्ती करताना दिसले. मेहबूब खान या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. म्हणजे एकंदरीत बॉलिवूडमध्ये होळी आणण्याचे संपूर्ण श्रेय मेहबूब खान यांना जाते.

राज कपूर यांची होळी होती खास 

यानंतर होळी अनेक चित्रपटांमध्ये दिसली. इतकेच नाही, तर होळीचा क्लायमॅक्स सीनही करण्यात आला. चित्रपटांपेक्षा वेगळ्या गोष्टींबद्दल बोलायचे झाले, तर एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील होळीचीही खूप चर्चा होते. राज कपूरच्या होळीची पूर्वी इंडस्ट्रीत वेगळीच क्रेझ असायची. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या होळीचीही खूप चर्चा झाली. पण ते युग आता राहिले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा