मनोरंजनविश्वातील राजकारणात प्रवेश करणे ही बाब काही लोकांना नवीन नाही. आजपर्यंत अनेक बॉलिवूड, मराठी कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. अभिनय आणि राजकारणसोबत करणारे देखील अनेक कलाकार आहे. कलाकार आणि राजकारण यांचे नाते देखील खूपच वेगळे आणि रंजक आहे. अनेक कलाकार राजकारणात जातात तर काही राजकारणी अभिनयात देखील येतात. आता नुकतीच मराठी सिनेविश्वातील एका कलाकाराने राजकारणात जाण्याच्या प्रश्नावर भाष्य केले आहे.
मराठी चित्रपटांमधील अतिशय उत्तम संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक आणि गायक अवधूवत गुप्ते नेहमीच त्याच्या गाण्यांसाठी, चित्रपटांसाठी प्रकाशझोतात येत असतो. मराठीमध्ये त्याचे नाव चांगलेच गाजत असते. अवधूत नेहमीच विविध कार्यक्रमांमधून राजकारणावर बोलताना दिसतो. दिग्दर्शक म्हणून देखील त्याने त्याचा पहिला सिनेमा ‘झेंडा’ हा राजकारांवरच काढला होता. त्याला राजकारण चांगलेच आवडताना दिसते. अवधूत गुप्ते राजकारणात जाणार का? या प्रश्नावर त्याने नुकतेच त्याचे मत मांडले आहे.
View this post on Instagram
अवधूतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य करताना सांगितले की, “कोणतीही निवडणूक जवळ आली की मला लगेच याबद्दल विचारले जाते. म्हणूनच मी आता राजकारणात प्रवेश करणार आहे हे जाहीरच करुन टाकतो. कशासाठी राजकारणात यायचे किंवा कोण चांगले राजकारण करु शकते? ज्यांना स्वत:चे पोट भरायची चिंता नाही, तोच चांगले राजकारण करु शकतो. माझ्या आताच्या सर्व कर्तव्यांची पूर्तता होईल. संसार, कुटुंबाप्रती असलेल्या माझ्या जबबादाऱ्या संपलेल्या असतील, जेव्हा काही मिळवायचे नाही किंवा काही गमवायचे नसेल अशा वेळी मी राजकारणात येईन.”
View this post on Instagram
पुढे याबद्दलच बोलताना तो म्हणाला, “२०१९ च्या आमदारकीपासून मी हे सर्व पाहतोय. मी राजकारणात आल्यावर लोकं माझ्या राजकारणात येण्यामागच्या हेतूवर शंका घेऊ शकणार नाही. मलाही खात्री आहे की मी समाजकार्यासाठी म्हणून राजकारणात येईन. मी राजकारणासाठी प्रामाणिकपणे फक्त पाच वर्षच देईन. आपण घर साफ करतो, ती प्रत्येकाने आपली छोटीशी चौकट काही काळापुरती प्रामाणिकपणे साफ केली तर भारत बदलायला वेळ लागणार नाही. मी ज्या दिवशी येईन तेव्हा जाण्याचीही तारीख जाहीर करेन”, असे अवधूत गुप्तने त्याच्या वक्तव्यात सांगितले आहे.
अवधूतने त्याच्या करियरमध्ये अनेक चित्रपटांना संगीत देण्यासोबतच चित्रपटांमध्ये गायनही केले आहे. अवधूतचे अनेक अल्बम तुफान गाजले असून, तो एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे. त्याने ‘झेंडा’, ‘मोरया’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लॅव्हेंडर गाऊनमध्ये हरनाज संधूने घातला धुमाकूळ , फोटो पाहून चाहते झाले वेडे
‘आता शेंगदाणे विकू…,’, म्हणत अक्षया देवधरने मुंबई ट्रॅफिकवर भाष्य करत शेअर केली पोस्ट