Wednesday, February 21, 2024

अवधूत गुप्ते यांच्या विश्वकर्म अल्बममधील ‘दूर दूर’ गाण्याचा टिझर प्रदर्शित

अवधूत गुप्ते (Avdhoot Gupte) यांच्या ‘विश्वामित्र’ या अल्बममधील ‘विश्वामित्र’, ‘तुझ्या विना’ या श्रवणीय गाण्यांनंतर आता ‘दूर दूर’ हे तिसरे बहारदार गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा जबरदस्त टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत, बोल असलेल्या ‘दूर दूर’ या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच आजूबाजूला ‘त्या’ खास व्यक्तीचा भास होतो.

परंतु कधी कधी ‘त्या’ व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न केला तरी सर्वत्र तीच व्यक्ती दिसते. प्रेमातील हीच तळमळ या गाण्यातून व्यक्त होत आहे. अवधूत गुप्ते यांची खासियत या गाण्यातून दिसत असून उडत्या चालीचे हे गाणे सगळ्यांनाच आवडेल असे आहे. याचे सादरीकरणही उल्लेखनीय आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी असून येत्या ९ फेब्रुवारीला ‘दूर दूर’ गाणे प्रदर्शित होणार आहे.

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, ” जिव्हाळा, आठवणी, दुरावा, भास या सगळ्या गोष्टींचा माणूस प्रेमात अनुभव घेतो. हे सगळे अनुभव दाखवणारे ‘दूर दूर’ हे गाणे आहे. मनाला भावतील असे या गाण्याचे बोल आहेत. सर्वत्र तिचाच भास होत असल्याचे या गाण्यातून सांगण्यात येत आहे. जुन्या प्रेमाची आठवण करून देणारे, एकांतात ‘ती’ची आठवण करून देणार हे गाणे आहे. हे गाणे माझ्या दोस्तांना नक्कीच आवडेल.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

संदीप रेड्डी वंगा यांना झाला चुकीचा पश्चाताप, ज्येष्ठ गीतकारावर टीका केल्याची खंत केली व्यक्त
लेकी श्रुतीसोबत चित्रपटात काम करणार कमल हसन, लोकेश कनागराज करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

हे देखील वाचा