Thursday, April 18, 2024

‘एका तुटलेल्या हार्टची’ कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अवधूत गुप्तेने केली ‘या’ म्युझिक अल्बमची घोषणा

अवधूत गुप्ते हे त्यांच्या चाहत्यांसाठी, संगीतप्रेमींसाठी नेहमीच काहीनाकाही नवीन घेऊन येत असतात. त्यांचा ‘लावण्यवती’ला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी ‘विश्वमित्र’ ची घोषणा केली आहे. हा अल्बम १९ जानेवारीला येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे.

या अल्बममध्ये ४ गाणी असणार आहेत. प्रत्येक गाणं एका तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगेल. ‘लवचा खंजीर जर एकदा छातीत घुसला तर कुणाचं रक्त निघतं आणि कुणाची गाणी’ असं म्हणत लवकरच यातील गाणी प्रेक्षकांच्या भेटली येणार आहेत.

या अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, ” पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी आणि संगीतप्रेमींसाठी आम्ही एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ अल्बम घेऊन आलो आहे. या अल्बममध्ये चार गाणी आहेत. ही चारही गाणी अधुऱ्या प्रेम कहाणीवर आधारित आहे. जसं प्रेम ‘लावण्यवती’ ला मिळालं तसंच ‘विश्वामित्र’ ला ही मिळेल याची मला खात्री आहे.“

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सनी देओलच्या ‘सफर’ चित्रपटात दिसणार सलमान खानची झलक, करणार कॅमिओ रोल
‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची डिलिव्हरी ‘भाऊचा नादखुळा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा