टेलिव्हिजन अभिनेत्री अविका गौर ही तिच्या लव्ह लाईफमुळे अनेकवेळा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. तिचे नाव ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील तिचा को-स्टार मनीष रायसिंघन याच्यासोबत अनेक दिवसांपासून जोडलेले आहे. नुकतेच अविकाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, मनीषसोबत तिच्या लिंकअप बातम्यांनी तिच्यावर खूप परिणाम झाला होता. एवढंच काय तर ते दोघे अनेक दिवस एकमेकांपासून लांब होते. अनेक आठवडे ते बोलले देखील नव्हते. (Avika gor on rumours that she has secret affair with manish raisinghan he almost my dad’s age)
अविकाने तिच्या मुलाखतीत सांगितले, एकदा तर अशी बातमी आली होती की, त्या दोघांना एक बाळ देखील आहे. यावर बोलताना अविकाने सांगितले की, “हे अशक्य आहे. काही बातम्यांमध्ये असे आले होते की, आम्ही आमचे बाळ लपवून ठेवले आहे. आम्ही आता देखील क्लोज आहोत. मनीषचे माझ्या आयुष्यात एक स्थान आहे. 13 वर्षाच्या माझ्या या प्रवासात तो माझ्या आयुष्यातील माझा खूप जवळचा मित्र आहे. मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकले आहे. तो माझ्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा आहे. अनेक वेळा मला हा प्रश्न विचारला गेला आहे की, तुमच्यामध्ये काही होते का? तेव्हा मी उत्तर देते की, यार तो माझ्या वडिलांपेक्षा काही वर्षांनीच लहान आहे.”
अविकाने सांगितले की, “सुरुवातीच्या दिवसात या गोष्टींचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता. मी जवळ पास 2 आठवडे मनीष सोबत बोलायचे सोडून दिले होते. परंतु जेव्हा ही बातमी सगळीकडे पसरली आणि आम्हाला समजले की, ही गोष्ट खूप सामान्य झाली आहे, तेव्हा आता लांब राहण्यात काहीच फायदा नाहीये. त्यानंतर आम्ही कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर अशा बातम्या वाचल्या की, आम्हाला हसायला येतं.”
याआधी देखील मनीषने त्याच्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो पहिल्यांदा त्याच्या पत्नीला भेटला होता, तेव्हा तिला देखील असेच वाटले होते की, तो आणि अविका एक कपल आहेत. मनीषने सांगितले की, “जेव्हा मी संगीतासोबत डेट करणे चालू केले होते, तेव्हा तिला देखील असे वाटायचे की, आमच्यात काहीतरी आहे. पण मला तेव्हा तिला समजावणे खूप अवघड गेले होते की, आमच्यात असे काहीच नसून निव्वळ मैत्री आहे. संगीता म्हणाली होती की, माझी आणि अविकामधील केमिस्ट्री बघून तिला असे वाटायचे की, ते दोघे कपल आहेत.”
अविका आणि मनीषने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत एकत्र काम केले होते. ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. पण त्यांचे नाते वेगळ्या प्रकारे जगासमोर आले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तिरंगा’ चित्रपटासाठी नानांनी दिला होता नकार; मात्र नंतर ‘ही’ विचित्र अट सांगत भरली त्यांनी हामी
-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद