Thursday, March 28, 2024

केवळ २०व्या वर्षी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली अवनीत, नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत करणार काम

‘अलादीन’ फेम अवनीत कौर हिने खूप कमी वयात अभिनयातील करिअरला सुरुवात केली. तिच्या अभिनयाने आणि डान्सने तिने सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे. केवळ २० वर्षांची अवनीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच ती लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे, अशा चर्चा चालू आहेत. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात डान्स रियॅलिटी शोमधून केली होती. आज ती इंडस्ट्रीमधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे.

अवनीत २० व्या वर्षी कंगना रणौत दिग्दर्शित नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे. हा चित्रपट अवनीतचा पहिला चित्रपट असणार आहे. ज्यात ती मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. तसेच दिग्दर्शक म्हणून देखील कंगनाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अवनीत तसलीम खान उर्फ टिकूची भूमिका निभावणार आहे. (Avneet kaur go enter in bollywood with kangana Ranaut and Nawazuddin Siddiqui)

अवनीत केवळ १० वर्षाची असताना तिने डान्स शो ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’मधून करिअरची सुरुवात केली होती. परंतु सेमी फायनलच्या आधीच ती शोमधून बाहेर गेली होती. अवनीत एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. तिने ‘डान्स के सुपरस्टार’ मध्येही भाग घेतला होता.

अवनीतने २०१२ मध्ये ‘मेरी मॉं’ मधून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. यामध्ये तिने ‘झिलमिल’ ही भूमिका निभावली होती. तिने ‘सावित्री’, ‘एक मुट्ठी आसमान’, ‘हमारी बहन दीदी’ आणि आणखी काही शोमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे.

तिने ‘झलक दिख लाजा’ या शोच्या पाचव्या सिझनमध्ये देखील भाग घेतला होता. यामध्ये ती सातव्या क्रमांकावर होती. अवनीतने ‘अलादीन नाम तो सुना होगा’ मध्ये राजकुमारी यास्मिनचे पात्र निभावले होते. या पात्राने तिला खूप लोकप्रियता दिली होती. ‘अलादीन’ आधी तिने ‘चंद्र नंदिनी’मध्ये राजकुमारी चारुमतीच्या भूमिकेत दिसली होती. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. अवनीतचे सोशल मीडियावर २६.१ मिलियन फॉलोवर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा