आयुष्मान खुरानाने दुर्बिणीतून चंद्र पाहतानाचा फोटो केला शेअर; पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘सुशांत’

अभिनेता आयुष्मान खुराना नेहमीच आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो अनेकदा फोटो आणि व्हिडिओ शअर करून चाहत्यांशी जोडलेला असतो. अशातच तो सध्या आपल्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. अभिनेता दरदिवशी आपल्या सुट्ट्यांचे फोटो शेअर करत आहे. त्याने नुकतेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो टेलिस्कोपमधून रात्री चंद्राकडे पाहताना दिसत आहे.

अभिनेत्याने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा चंद्राचा वॅक्सिंग गिब्स टप्पा आहे, हे खूप आश्चर्यकारक आहे. तुम्ही नुकताच चंद्र पाहिला आहे का? दुर्बिणीद्वारे ते खूप तेजस्वी आहे. आम्ही गुरूच्या ७९ चंद्रांपैकी ४ चंद्र आणि शनीचे वलय देखील पाहिले आहेत. इतर बातम्यांमध्ये, ओरियन नक्षत्र वाढत आहे, जे हिवाळ्यात शिखर गाठेल. खगोलशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा असलेल्या २० वर्षीय मार्विनने आम्हाला मालदीवमध्ये रात्रीचे आकाश दाखवले, जो सागरी जीवशास्त्राचा अभ्यास करतो.” (Ayushmann Khurrana Shared Photos Watching Jupiters Saturns Rings Netizens Remind Sushant Singh Rajput)

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

सुशांत सिंग राजपूतची नक्कल न करण्याचा सल्ला
आयुष्मानचा हा फोटो अनेकांना आवडला आहे, तर काहींनी त्याला दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची नक्कल केल्यामुळे चांगलेच सुनावले आहे. एका युजरने कमेंट करत त्याला म्हटले की, “कृपया सुशांतची नक्कल करू नको.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तुमचा हा फोटो सुशांत सिंगची आठवण करून देतो.”

आयुष्मानप्रमाणे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतलाही खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातही रस होता. त्याने सन २०१७ मध्ये त्याच्या बाल्कनीमध्ये मीड १४ “एलएक्स- ६०० दुर्बीण लावली होती. यातून तो नेहमी गुरू आणि शनीचे रिंग पाहायचा. या दुर्बिणीची किंमत ६.४४ लाख रुपये होती.

View this post on Instagram

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput)

आयुष्मानने ताहिराला म्हटले, ‘मर्लिन मन्रो’
आयुष्मान मालदीवच्या सुट्टीतील फोटो सतत शेअर करत असतो. अलीकडेच अभिनेत्याने पत्नी ताहिरा कश्यपसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ताहिरा खूपच आकर्षक दिसत होती. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले होते की, “मी आणि मर्लिन.” खरं तर, या फोटोमध्ये ताहिराचा ड्रेसिंग सेन्स मर्लिन मन्रोच्या प्रसिद्ध फोटोसारखीच दिसते.

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मानच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तो शेवटचा सन २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

Latest Post