Saturday, June 29, 2024

‘बच्चन पांडे’मधील ‘हिर रांझना’ गाण्याचा टिझर रिलीज, अक्षय अन् जॅकलिनच्या केमेस्ट्रीने जिंकली लाखो मने

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’चे जोरदार प्रमोशन चालू आहे. अशातच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये चित्रपटाचे अनेक स्टार्स एकत्र दिसले आहेत. हा चित्रपट मागील अनेक दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारचा एक वेगळाच लूक, प्रेझेंटेशन, ऍक्शन, कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून अनेक गोष्टी समजल्या आहेत. तसेच या चित्रपटातील ‘हीर रांझना’ या गाण्याचा टिझर देखील प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस यांची केमेस्ट्री साफ दिसत आहे.

अक्षय कुमार नेहमीच एक नवीन चित्रपट आणि एका नवीन विचारासोबत प्रेक्षकांसमोर येत असतो. प्रेक्षक अजून त्याच्या आधीच्या चित्रपटाच्या हॅंग ओव्हरमधून बाहेर आले नाही अशातच त्याचा नवीन चित्रपट आला आहे. तो त्याच्या चाहत्यांना त्याची जास्त वाट पाहायला देखील लावत नाही. ‘बच्चन पांडे’मधील ‘हिर रांझना’ गाण्याचा टिझर खूप व्हायरल होताना दिसत आहे. अक्षय आणि जॅकलिन देखील यात खूपच सुंदर दिसत आहेत. (Bachchan Pandey movies heer ranjhana song released)

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला अक्षय कुमारसोबत केलेली बरीच गाणी होत झाल्यानंतर आता ‘हिर रांझना’ या गाण्याच्या टिझर प्रदर्शित केलं आहे. गाण्याची झलक सगळ्यांना खूप आवडली आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी आणि संपूर्ण गाणे पाहण्यासाठी सगळेच खूप उत्साही आहेत. या गाण्यात राजस्थानचे बॅकग्राउंड पाहायला मिळत आहे.

फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केलेला अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरने च सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत. या चित्रपटात क्रिती सेनन, अरशद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस सोबत बाकी अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट १८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा