Monday, April 15, 2024

अखेर प्रतीक्षा संपली ! या दिवशी प्रदर्शित होणार ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटाचा ट्रेलर

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट सतत चर्चेत असतो. चित्रपटाचा टीझर आणि गाणी रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. प्रेक्षकही या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या ट्रेलरची वाट पाहत आहेत. वाशू भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंटच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा ट्रेलर २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स आणि चमकदार स्टार कास्ट प्रेक्षकांचा थरार वाढवणार आहेत.

नुकतेच ‘वल्लाह हबीबी’ या चित्रपटाचे नवीन गाणे प्रदर्शित झाले, जे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेची घोषणा करताना, निर्मात्यांनी एक पोस्टर देखील शेअर केले आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार बडे मियाँच्या भूमिकेत तर टायगर श्रॉफ छोटे मियाँच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचवेळी मानुषी छिल्लर आणि अलाया एफ हातात शस्त्रे घेऊन दिसत आहेत. चित्रपटाचे हे पोस्टर पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मधील सर्वच पात्र धमाकेदार ॲक्शन करताना दिसणार आहेत.

वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. 10 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, आलिया एफ आणि मानुषी छिल्लरशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा यांच्याही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये प्रेक्षकांना ॲक्शनसोबतच कॉमेडीही पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘जब वी मेट’च्या सिक्वेलवर इम्तियाज अलीची प्रतिक्रिया, शाहिद-करीना नव्हे तर या जोडीला कास्ट करणार कास्ट
‘मी तिला गोळी मारेल’, अभिनयात येण्याच्या निर्णयाने कंगना रणौतच्या वडिलांनी दिली होती संतप्त प्रतिक्रिया

हे देखील वाचा