Tuesday, April 15, 2025
Home मराठी मानसीच्या अदांनी उडवला दणका; वाचा गीतकार-संगीतकार यांच्याकडून ‘बाई वाड्यावर या 2’ गाण्याचे खास किस्से

मानसीच्या अदांनी उडवला दणका; वाचा गीतकार-संगीतकार यांच्याकडून ‘बाई वाड्यावर या 2’ गाण्याचे खास किस्से

मानसी नाईकच्या (Manasi Naik) ‘बाई वाड्यावर या’ या गाण्याने रसिकांना वेड लावले होते. प्रत्येक मिरवणुकीत मोठ्या जल्लोषात हे गाणं वाजवून लोकं ठेका धरायचे. या गाण्याची लोकप्रियता पाहता याचं दुसरा भाग घेऊन येण्याचाही निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. अशातच आता हे बहुप्रतिक्षित ‘बाई वाड्यावर या २’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पुन्हा एकदा मानसी नाईकच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात मानसी नाईकसोबत सचिन बक्षी देखील झळकला आहे. एकूण ४ मिनिटं १२ सेकंदाच्या या गाण्याने प्रेक्षकवर्गाला थिरकायला भाग पाडलं आहे.

‘दैनिक बोंबाबोंब’सोबत गप्पा!
अलीकडेच गाण्याचे लेखक गीतकार, रचनाकार डॉ. विवेक सानप आणि संगीत दिग्दर्शक प्रज्वल यादव यांनी ‘दैनिक बोंबाबोंब’च्या ऑफिसला भेट दिली. यावेळी पोर्टलच्या सहकाऱ्यांसह त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या. या खास भेटीत त्यांनी ‘बाई वाड्यावर या २’च्या शूटिंग आणि निर्मिती दरम्यानचे रंजक किस्से आणि विनोदही ऐकवले. यासंबंधित खास व्हिडिओही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

पाहा व्हिडिओ-

कुठे पाहू शकता व्हिडिओ?
‘बाई वाड्यावर या २’ हे गाणं 7 सीरिज रेकॉर्ड्स मराठी या चॅनलवर प्रदर्शित झालं असून, ते तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. या गाण्याची निर्मिती शंतनू फुगे यांनी केली आहे. तसेच गायक रोहित राऊतने हे गाणं गायलं असून, राहुल माने यांनी गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. शिवाय कलाकार मानसी नाईक आणि सचिन बक्षी यांच्या अभिनयाने आणि डान्सने गाण्यात वेगळीच रंगत पाहायला मिळाली आहेच.

हेही वाचा :

हे देखील वाचा