×

प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस बोलणार शिव तांडव स्तोत्र, नव्या लूकने उडवलाय दणका

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी आता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक गायिका म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले असून, आता त्या गायिका अमृता फडणवीस म्हणून ओळखल्या जातात. अमृता यांची आतापर्यंत अनेक गाणी प्रदर्शित झाली असून, त्यांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अमृता यांचा मनोरंजनविश्वातील वावर चांगलाच वाढला आहे. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्या मधुर आवाजामधील एक नवीन गाणे प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. याच महिन्यात व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी अमृता यांनी त्यांच्या आगामी गाण्यामधील लुकचा एक फोटो शेअर केला होता.

अमृता फडणवीस यांचे येत्या २४ फेब्रुवारी रोजी शिव तांडव स्त्रोत्र या गाण्याचा अळंबीम प्रदर्शित होत आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या या गाण्याच्या प्रदर्शनाबद्दल माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी त्यांचे एक पोस्टर देखील शेअर केले आहे. यात अमृता यांचा साध्वी वेष दिसत असून, नारंगी रंगाची वस्त्रे, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात त्रिशूल दिसत असून, सोबतच शंकराची मूर्ती देखील दिसत आहे.

महाशिवरात्रीच्या पवित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हे गाणे प्रदर्शित होत आहे .या शिव तांडव स्तोत्राचे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले, “हा अल्बम एक वेगळाच अनुभव होता. माझ्या आयुष्यातील हा सर्वात दैवी संगीतमय अनुभव.” हा शिव तांडव स्त्रोत्र अल्बम करताना त्यांना एक वेगळीच अनुभूती आली असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृता फडणवीस यांच्या शिव तांडव स्त्रोत्र या त्यांच्या गाण्याचे पोस्टर ज्या वेळी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा अगदी थोड्या काळातच त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अभिनंदनाचा आणि कौतुकच्या कमेंट्स केल्या आहेत. आता अनेक नेटिझन्सना २४ तारखेची प्रतीक्षा आहे, ते फक्त अमृता फडणवीस यांच्या शिव तांडव स्त्रोत्राची. अमृता या त्यांच्या विविध विवादित वक्तव्यांमुले देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेत असतात, नुकतीच त्यांनी झी मराठीच्या ‘किचन कल्लाकर’ शोमध्ये हजेरी लावली होती.

हेही वाचा –

‘एका जीवाचं वजन उचलतोय’ उर्मिला निंबाळकरची डिलिव्हरीनंतरच्या स्त्रीच्या त्रासावरची पोस्ट व्हायरल

देवदासमधील चंद्रमुखी बनत माधुरीने हुनरबाजचा मंचावर पसरवला तिच्या नेत्रदीपक नृत्याचा जलवा

सोशल मीडियावर व्हायरल झाला शाहरुख खानचा नवीन लूक, फोटो पाहून फॅन्स म्हणाले ‘पठाण’चा नवीन लूक

Latest Post