×

लग्नाचा वाढदिवस लक्षात रहावा म्हणून अजय देवगणने लढवली नामी शक्कल

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यामधील अजय देवगण आणि काजोल हिंदी चित्रपटसृष्टीतील क्यूट कपल म्हणून प्रसिद्ध आहे. दोघांची जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता लवकरच अजय देवगण आणि काजोलच्या लग्नाचा वाढदिवस येत आहे. हा वाढदिवस लक्षात रहावा म्हणून अजय देवगणने एक भन्नाट युक्ती शोधली आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेता अजय देवगण हिंदी चित्रपट जगतातील आघाडीचा नायक म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयासाठी तो हिंदी चित्रपट जगतात विशेष प्रसिद्ध आहे. ‘सिंघम’, ‘गोलमाल’ सारख्या अनेक चित्रपटात अजयने काम केले आहे. सोशल मीडियावर सुद्धा अजय देवगण नेहमीच प्रसिद्ध असतो. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अजय देवगण नवनवीन फोटो पोस्ट करत असतो. मात्र यावेळी अजय देवगणने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अजय देवगण आणि काजोल यांच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला असून तो विसरू नये म्हणून अजय देवगणने एक शक्कल लढवली आहे. यामध्ये अजयने आधीच एक फोटो शेअर करून त्याला रिमायंडर सेट केला आहे. सोबतच त्याने आता विसरणार नाही असा कॅप्शन ही दिला आहे. सध्या अजय देवगण च्या याच पोस्टची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या पोस्टवर चाहते भन्नाट प्रतिक्रिया दिसत आहेत. काही जणांनी या पोस्टवर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत तर काही चाहत्यांनी या पोस्टला बायकोची भीती अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तत्पूर्वी अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांच्या जोडीने 90 च्या दशकातील प्रेक्षकांना वेड लावले होते. दोघांच्या चित्रपटातून त्यांच्या प्रेमाचीच झलक पाहायला मिळत होती. काजोल आणि अजय देवगण दोघेही अनेक वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंतर दोघांनी 1999 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. काजोल आणि अजय देवगणला दोन मुलेही आहेत. काजोल सध्या चित्रपट क्षेत्रात झळकत नसली तरी अजय देवगण मात्र आजही अनेक चित्रपटात काम करताना दिसतो. त्याचा ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटात अजय देवगणने लक्षवेधी भूमिका साकारली आहे.

हेही वाचा –

‘एका जीवाचं वजन उचलतोय’ उर्मिला निंबाळकरची डिलिव्हरीनंतरच्या स्त्रीच्या त्रासावरची पोस्ट व्हायरल

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या’ यशस्वी कलाकारांना वयाच्या पस्तिशीनंतर मिळाला आयुष्याचा खरा जोडीदार

बालपणी सुपरहिट ठरलेल्या ‘या’ कलाकारांना मोठेपणी मिळाले नाही अपेक्षित यश

Latest Post