बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) च्या सुपरहिट चित्रपटांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती. हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता, प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. चित्रपटात सलमान खान, करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यानंतर सर्वांचे लक्ष लहान मुलगी हर्षाली मल्होत्रा (Harshali Malhotra) हिच्याकडे वेधले गेले. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात ‘मुन्नी’ ची भूमिका साकारणाऱ्या हर्षालीने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मुन्नीची भूमिका साकारून हर्षाली एका रात्रीत स्टार झाली. नुकताच हर्षालीने तिचा एक सुंदर व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत होत आहे
हर्षाली सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या हर्षालीने पुन्हा एकदा तिचा एक सुंदर व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्याला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. त्यामुळेच चाहते तिच्या या व्हिडिओवर भरभरून प्रेम करत आहेत आणि कमेंटही करत आहेत. व्हिडिओमध्ये हर्षाली कनिका कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
हर्षालीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती गुलाबी रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाचा डंगरी स्टाईल जंप सूट परिधान करून अतिशय गोड स्टाईलमध्ये ‘लव्ह लेटर’ गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत हर्षालीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “आणखी कोण खोटे वचन देत आहे?” हर्षालीने काही वेळापूर्वी हा व्हिडिओ शेअर केला होता आणि काही वेळातच त्याला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. यावर चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडिओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “अरे मुन्नी मोठी झाली आहे, आता हरवण्याची भीती नाही.” तर दुसर्या युजरने लिहिले की, “मला तुमचा ऑटोग्राफ मिळेल का?” तर आणखी एका युजरने लिहिले की, “खूप छान डान्स, तू खूप क्यूट दिसत आहेस.” अशा प्रकारे हर्षालीच्या व्हिडिओवर चाहते प्रेमाची उधळण करत आहेत.